आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) 2020मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप स्थगित झाल्याची घोषणा करताना 2021 व 2022च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानांची नावं जाहीर केली नव्हती. 2021चा वर्ल्ड कप भारतात होणार होता आणि आयसीसीनं यजमानांची नावं जाहीर न केल्यानं संभ्रम निर्माण झाला होता. 2021च्या वर्ल्ड कपचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळेल आणि 2022मध्ये भारत यजमानपद भूषवतील, असा तर्क लावला जात होता. पण, मागील आठवड्यात आयसीसीनं याबाबतच संभ्रम दूर झाले. 2021चा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याचे आयसीसीनं जाहीर केलं. तरीही आयसीसीनं भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी बॅक अप प्लान तयार केला आहे. त्यामुळे हा वर्ल्ड कप भारतात होणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीनं यंदाचा वर्ल्ड कप स्थगित केला. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 23 लाख 95,471 इतका झाला आहे आणि सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत भारत तिसऱ्या स्थानी आहे. भारतातील 16 लाख 95,860 रुग्ण बरे झाले असून 47,138 जणांना प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा निर्णय झाला आहे. हीच स्थिती लक्षात घेता आयसीसीनं बॅक अप प्लान तयार केला आहे.
भारतातील कोरोना परिस्थिती न सुधारल्यास 2021चा वर्ल्ड कप श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा विचार आयसीसीनं केला आहे आणि तसा बॅक अप प्लानही तयार आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारी महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धा आयसीसीनं स्थगित केली. आता 2021मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठीही आयसीसीनं पर्याय निवडले आहेत.
Web Title: Sri Lanka, UAE among back-up venues for 2021 T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.