दुबई : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला पिछाडीवर टाकले आहे. एका वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्मिथने अॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात 144 आणि 142 धावांची खेळी केली होती. हाच फॉर्म त्याने दुसऱ्या कसोटीतही कायम राखताना 92 धावा केल्या. पण, इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या बाऊंसरवर स्मिथ जायबंदी झाला. दुखापतीमुळे स्मिथ दुसऱ्या डावात फलंदाजीला येऊ शकला नाही, परंतु ऑसींनी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. या कसोटीनंतर स्मिथने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याची ही झेप भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या अव्वल स्थानाला आव्हान देणारी ठरणारी आहे. जाणून घ्या कशी....
पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून 286 धावा करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. दुसऱ्या सामन्यातही स्मिथचा तोच फॉर्म कायम दिसला. पण, आर्चरने एका बाऊन्सद्वारे स्मिथला जायबंदी केले आणि त्यामुळेच स्मिथला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही. आर्चरच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू मानेवर लागून स्मिथ जखमी झाला. त्यावेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुढे फलंदाजी केली. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागला. त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणे त्याच्यासाठी अशक्य झाले.
या कसोटी सामन्यानंतर स्मिथने
आयसीसी क्रमवारीत 913 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीपूर्वी स्मिथ 857 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता आणि विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या... पण, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विलियम्सनला दोन्ही डावांत अपयश आले. त्यामुळे आज जाहीर झालेल्या क्रमवारीत त्याची 887 गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. भारताचा कॅप्टन कोहली 922 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, परंतु स्मिथ आणि त्याच्यातील गुणांचे अंतर हे केवळ 9 गुणांचे राहिले आहे. त्यामुळे कोहलीच्या अव्वल स्थानाला स्मिथकडून धोका निर्माण झाला आहे.
Ashes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय...
12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!
Web Title: Steve Smith closes in on top-ranked Virat Kohli in ICC Test Rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.