खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येतच असतात. जेव्हा खेळाडू यशोशिखरावर असतो तेव्हा चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. त्याच खेळाडूकडून एखादी चूक होते, तेव्हा हेच चाहते टीका करताना विचारही करत नाहीत. 15 वर्ष टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवीच्या आयुष्यातही असा प्रसंग आला. त्याच्या एका चुकीमुळे चाहते ऐवढे भडकले की त्यांनी युवीच्या घरावर दगडफेक केली. आजही तो प्रसंग आठवला की युवी भावुक होतो.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?
2012मध्ये कॅन्सरवर यशस्वी मात करून युवी पुन्हा मैदानावर परतला होता. पण, 2014च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यातील त्याच्या संथ खेळीनं सर्वांचा रोष ओढावून घेतला. श्रीलंकेविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात युवीला 21 चेंडूंत 11 धावाच करता आल्या. श्रीलंकेनं 6 विकेट्सनं विजय मिळवला.
2014च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पराभवाची जबाबदारी युवीनं घेतली. तो म्हणाला,''त्या पराभवाची मी पूर्णतः जबाबदारी स्वीकारतो. मी चेंडूवर फटके मारू शकलो नाही, परंतु लंकन गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. दुसरे फलंदाजही चाचपडताना दिसले, परंतु चाहते आणि मीडियानं मला खलनायक ठरवले. माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा भारताची कॅप आणि सहा षटकार मारलेली बॅट पाहिली. तेव्हा मला खात्री पटली की माझ्या निवृत्तीची वेळ आली आहे.''
युवीच्या संथ खेळीमुळे भारताला 20 षटकांत 4 बाद 130 धावाच करता आल्या आणि श्रीलंकेनं हे लक्ष्य 6 विकेट्स राखून सहज पार केले. ''माझ्या घरावर दगडफेक झाली. मला अपराध्यासारखं वाटत होतं. त्या क्षणी मला काय वाटत होतं, ते आजही चांगलं लक्षात आहे. त्यादिवशी सचिन तेंडुलकरनं एक ट्विट केलं होतं आणि लोकांना ते पटलंही होतं.''
आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला
Web Title: ‘Stones were thrown at my house’: Yuvraj Singh recalls 2014 T20I World Cup final svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.