अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम

सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:19 PM2024-06-10T18:19:56+5:302024-06-10T18:32:20+5:30

whatsapp join usJoin us
t20 world cup 2024 aus vs eng Australia's star matthew Wade reprimanded for showing dissent at an umpire’s decision, read here details | अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम

अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Matthew Wade ICC : सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून बलाढ्य ऑस्ट्रेलियाने आपला विजयरथ कायम ठेवला. ब गटातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात एक नाट्यमय घडामोड घडली. ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू वेडने अम्पायरशी वाद घालताच एकच गोंधळ उडाला. मात्र, आता हे प्रकरण ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या अंगलट आल्याचे दिसते. कारण वेडला आयसीसीने फटकारले असून इशारा दिला आहे.

ऑस्ट्रेलियाने ३६ धावांनी सामना आपल्या नावावर करून इंग्लिश संघाला पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १८ व्या षटकात वेडने आदिल राशिदने टाकलेला चेंडू पुन्हा गोलंदाजाकडे टोलावला. अम्पायर या चेंडूला डेट बॉल घोषित करतील असे वेडला अपेक्षित होते. डेड बॉलसाठी वेड मागणी करत होता, परंतु अम्पायर नितीन मेनन यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि गपचूप फलंदाजी कर असा इशारा केला. मेनन यांची ही रिअॅक्शन पाहून वेडही आश्चर्यचकित झाला. 

मॅथ्यू वेडला ICC ने फटकारले
खरे तर ऑस्ट्रेलियाच्या डावातील १८व्या षटकात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल राशिदच्या चेंडूवर वेडने चौकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडूवर राशिदने चेंडू टाकल्यानंतर वेडने आपण तयार नसल्याचे सांगून बॅटने चेंडू अडवला. अम्पायर हा डेड बॉल देतील असे वेडला अपेक्षित होते, परंतु मेनन यांनी चेंडू योग्य ठरवला. हे पाहून वेड त्यांच्याशी हुज्जत घालायला पुढे आला, तितक्यात मेनन यांनी त्याला परत फलंदाजीला जा असा इशारा केला. 

मॅथ्यू वेडला फटकारताना आयसीसीने म्हटले की, मॅथ्यू वेडने खेळाडू आणि सपोर्ट कर्मचाऱ्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद २.८ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर असहमती दाखवण्याशी संबंधित आहे. याशिवाय वेडने नियम तोडल्याच्या बाबतीत त्याच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला. २४ महिन्यांच्या कालावधीतील हा त्याचा पहिला गुन्हा आहे. 

Web Title: t20 world cup 2024 aus vs eng Australia's star matthew Wade reprimanded for showing dissent at an umpire’s decision, read here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.