T20 World Cup 2024 Prize Money: T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया बनली मालामाल! दक्षिण आफ्रिकेने पराभवानंतरही केली करोडोंची कमाई

T20 World Cup 2024 Prize Money: T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस सुरू झालाय. टीम इंडियाला बक्षीस म्हणून २० कोटी ४२ लाख रुपये मिळाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 09:56 AM2024-06-30T09:56:08+5:302024-06-30T09:57:22+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 Prize Money Team India became rich by winning the T20 World Cup South Africa earned crores | T20 World Cup 2024 Prize Money: T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया बनली मालामाल! दक्षिण आफ्रिकेने पराभवानंतरही केली करोडोंची कमाई

T20 World Cup 2024 Prize Money: T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया बनली मालामाल! दक्षिण आफ्रिकेने पराभवानंतरही केली करोडोंची कमाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 Prize Money: टीम इंडियाने काल इतिहास रचला. भारताने T20 विश्वचषक २०२४ चा विजेतेपदाचा सामना ७ धावांनी जिंकला आणि ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. टीम इंडियाने अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती, तर भारताला १३ वर्षांनंतर विश्वचषक आणि १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर T20 विश्वचषक जिंकण्यात यश आले आहे. भारतीय संघासाठी ही स्पर्धा अतिशय शानदार ठरली आहे. टीम इंडिया एकही सामना न गमावता चॅम्पियन बनली आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने अपराजित राहून ट्रॉफी जिंकली. आता टीम इंडियाला या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. विजेतेपदाचा सामना गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने या काळात कोट्यवधींची कमाईही केली. 

मालिकावीर! विजयानंतर पत्नी संजनाने बुमराहची घेतली भारी मुलाखत; 'बाप'माणूस भावूक, Video

टीम इंडियाने कमावले २०.४ कोटी रुपये

T20 विश्वचषकासाठी आयसीसीने यापूर्वीच बक्षीस रक्कम जाहीर केली होती. चॅम्पियन टीम इंडियाला अंतिम सामन्यानंतर २०.४ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने  १.२८ मिलियन डॉलर्स म्हणजेच १०.६७ कोटी कमावले. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इंग्लंड आणि अफगाणिस्तानशिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघही मालामाल झाले आहेत. या विश्वचषकासाठी आयसीसीने एकूण ९३.७ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ठेवली होती.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त, T20 विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या अफगाणिस्तान आणि इंग्लंडच्या संघांना ७,८७,५०० डॉलर म्हणजे सुमारे ६.५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. या टॉप-4 संघांव्यतिरिक्त, यूएसए, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश, यांनी सुपर-8 मध्ये स्थान मिळवले आहे, त्यांना ३.१७ कोटी रुपये मिळतील.

T20 विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २० संघ सहभागी झाले होते. ९व्या ते १२व्या क्रमांकावर असलेल्या संघांना अंदाजे २.०६ कोटी रुपये आणि १३व्या ते २०व्या क्रमांकावर असलेल्या संघांना १.८७ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

Web Title: T20 World Cup 2024 Prize Money Team India became rich by winning the T20 World Cup South Africa earned crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.