T20 World Cup 2021: यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेकडे आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीची 'लिटमस टेस्ट' म्हणून पाहिलं जात आहे. त्यात मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमध्ये खराब फॉर्मशी झगडताना दिसतोय. आयपीएलच्या यंदाच्या पर्वाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे संघ गुणतालिकेत थेट सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
धोनीच्या CSK संघाला कसं पराभूत करता येईल? सेहवागनं दिला 'कानमंत्र'!
मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीचा फटका ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघासाठी देखील चिंतेचा विषय ठरू शकतो. कारण भारतीय संघासाठी निवड झालेले सर्वाधिक खेळाडू सध्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहेत. त्यात मुंबई इंडियन्स संघाची मधली फळी वाईट कामगिरीची नोंद करत आहे. यात सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्याकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यात हार्दिक पंड्या देखील पहिले दोन सामने खेळला नाही आणि तिसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. यामुळे भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
न्यूडल्स विकणाऱ्याला IPL ने केले मालामाल; रातोरात झाला लखपती
समोर आलेल्या माहितीनुसार वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघात बदल करण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक क्रिकेट बोर्डाला १० ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे भारतीय संघाला ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात बदल करण्याची संधी उपलब्ध आहे. मुंबई इंडियन्समधील सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचं भारतीय संघातील स्थान आता धोक्यात आलं आहे. त्यांच्या जागी भारतीय संघात आता श्रेयस अय्यर, मयांक अग्रवाल आणि संजू सॅमसन यांचा समावेश केला जाऊ शकतो, अशी दाट शक्यता आहे.
VIDEO: चहलनं ड्रेसिंग रुममध्ये 'कॉपी' केली मॅक्सवेलनं टिपलेल्या झेलची 'स्टाईल', 'असं' झालं सेलिब्रेशन!
श्रेयस अय्यरनं दुखापतीवर मात करत आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केलं असून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना तो चांगल्या फॉर्ममध्येही दिसून येत आहे. तर पंजाबकडून सलामी करणाऱ्या मयांक अग्रवालनंही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलेलं आहे. इशान किशनची कामगिरी यापुढील सामन्यांमध्ये अशाच पद्धतीनं निराशाजनक राहिली तर त्याच्या जागी संजू सॅमसन याचा विचार केला जाऊ शकतो. कारण इशान किशन याचा भारतीय संघात एक राखीव यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला होता. पण त्याच्या फॉर्ममध्ये सुधारणा झाली नाही. तर संजू सॅमसन याला निवड समितीकडून प्राधान्य दिलं जाऊ शकतं.
Web Title: t20 world cup 3 middle order players replace suryakumar yadav ishan kishan indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.