T20 World Cup : भारतीय संघात अजूनही केला जाऊ शकतो बदल, IPL 2021मधील कामगिरीची घेतली जाणार दखल!

Indian team for the T20 World Cup : टीम इंडियानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 10:53 PM2021-09-08T22:53:47+5:302021-09-08T22:54:32+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup : India can change their T20 World Cup squad without any issues till 10th October | T20 World Cup : भारतीय संघात अजूनही केला जाऊ शकतो बदल, IPL 2021मधील कामगिरीची घेतली जाणार दखल!

T20 World Cup : भारतीय संघात अजूनही केला जाऊ शकतो बदल, IPL 2021मधील कामगिरीची घेतली जाणार दखल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian team for the T20 World Cup : टीम इंडियानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली. चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असा हा संघ आहे, तर राखीव खेळाडूंमध्ये एक फलंदाज व दोन जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल ही अपेक्षित नावं मात्र संघातून हद्दपार झाली आहेत. पण, टीम इंडियानं आज जाहीर केलेल्या संघात बदल केला जाऊ शकतो आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याची दखल घेतली जाऊ शकते. जाणून घ्या कशी... 


इंग्लंड दौऱ्यावर ज्या अश्विनला चार कसोटीत बाकावर बसवून ठेवले, त्यालाच थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान दिले गेले. आर अश्विन २०१७मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. तो मेंटर म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे. टीम इंडियाला १० ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करता येणार आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी करून काही खेळाडू टीम इंडियात एन्ट्री करू शकतील. ( India can change their T20 World Cup squad without any issues till 10th October. Some players who missed out may impress the selectors in the IPL 2021 2nd phase to find a place.) 


भारतीय संघ ( India T20 WorldCup squad)  - आघाडीची फळी - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल; मधली फळी - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन; अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल; फिरकीपटू - राहुल चहर, आर अश्विन, वरुण चक्रवर्थी; जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, दीपक चहर; संघात स्थान न मिळालेले खेळाडू - पृथ्वी शॉ, शिखर धवन, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर. 

Web Title: T20 World Cup : India can change their T20 World Cup squad without any issues till 10th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.