T20 World Cup prize money : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार कोट्यवधींचं ईनाम 

T20 World Cup prize money : सुपर १२मध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस रक्कमही दिली जाणार आहे. २०१६नंतर प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 03:09 PM2021-10-10T15:09:53+5:302021-10-10T15:12:12+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup prize money : The winner of the 2021 T20 World Cup will be awarded prize money of $1.6 million while the runners-up will take home $800,000 | T20 World Cup prize money : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार कोट्यवधींचं ईनाम 

T20 World Cup prize money : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार कोट्यवधींचं ईनाम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup prize money : १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बक्षीस रकमेची घोषणा रविवारी आयसीसीनं केली. सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील आणि वर्ल्ड कप विजेता संघ कोट्यधीश होणार आहे.

ICC  Men's T20 World Cup prize money - आयसीसीनं जाहीर केलेल्या बक्षीसरकमेनुसार विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉर म्हणजेच १२.२ कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्याला ८,००,००० डॉलर म्हणजेच ६.१ कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ४,००,००० डॉलर म्हणजे ३ कोटी मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५.६ मिलियन डॉलर  ( ४२ कोटी )  बक्षीस रक्कमेचे सहभागी १६ संघांमध्ये वाटप केले जाणार आहे.  

Prize money announced for the 2021 ICC Men's T20 World Cup सुपर १२मध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस रक्कमही दिली जाणार आहे. २०१६नंतर प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होत आहे. सुपर १२मध्ये ३० सामने होणार आहेत आणि प्रत्येकी ४० हजार डॉलर म्हणजेच एकूण १२,००,००० लाख डॉलर रक्कम वितरीत केली जाईल.  सुपर १२मधून बाद होणाऱ्या संघाला प्रत्येकी ७० हजार डॉलर मिळणार, म्हणजेच एकूण ५,६०,००० रक्कम दिली जाईल.    


पात्रता फेरीत सहभागी संघ
गट १ - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया
गट २ - बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमा

सुपर १२ फेरीतील संघ
गट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

Web Title: T20 World Cup prize money : The winner of the 2021 T20 World Cup will be awarded prize money of $1.6 million while the runners-up will take home $800,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.