दोन वर्षांच्या मेहनतीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देणाऱ्या टीम इंडियासाठी २३ जून हा दिवस अपयशाचा राहिला. न्यूझीलंड संघानं ८ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केलं अन् पहिल्या वहिल्या WTC स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. WTC Final नंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि तत्पूर्वी संघातील सर्वात अनुभवी जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) हा दुखापतग्रस्त झाला आहे. इशांतच्या उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून त्यावर टाके लावावे लागले आहेत.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंड विजयासमीप होता तेव्हा गोलंदाजी करताना इशांतला ही दुखापत झाली. रॉस टेलरनं मारलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात इशांतच्या बोटांना ईजा झाली आणि षटक पूर्ण न करता तो पेव्हेलियनला गेला होता. जसप्रीत बुमराहनं त्याचं षटक पूर्ण केलं. इशांतनं या सामन्यात ३१.२ षटकांत ३ विकेट्स घेतल्या.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, इशांतच्या उजव्या हाताच्या मधल्या व चौथ्या बोटावर टाके लावण्यात आले आहेत. त्याची दुखापत गंभीर नाही. आता भारतीय खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर आहेत.
भारताचा इंग्लंड दौरा ( India tour of England, 2021)
पहिली कसोटी - ४ ते ८ ऑगस्ट, ट्रेंट ब्रिज
दुसरी कसोटी - १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी - २५ ते २९ ऑगस्ट, हेडिंग्ली
चौथी कसोटी - २ ते ६ सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल
पाचवी कसोटी - १० ते १४ सप्टेंबर, ओल्ड ट्रेफर्ड
Web Title: Team India Fast bowler Ishant Sharma injured gets stitches after WTC Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.