टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार, तो टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळणार की मैदानाबाहेरच निवृत्ती जाहीर करणार, आदी अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात बाऊंसरसारखे आदळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून धोनीला वगळले आहे. त्यानंतर धोनीला निवृत्तीचे संकेत देण्यात आले, असाही अर्थ लावण्यात आला. धोनीनं मात्र झारखंड रणजी संघासोबत सरावालाही सुरुवात केली. पण, धोनीच्या निवृत्तीबाबत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी मोठं विधान केलं.
आगामी इंडियन प्रीमिअर लीग ही धोनीच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. पण, आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास धोनी निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्रींनी दिली.''मलाही तुम्हाला हेच विचारायचं आहे. आता आयपीएल येत आहे. त्यानंतर सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. निवड समिती, कर्णधार सर्वांचे आपल्याकडे लक्ष आहे, याची जाण धोनीलाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे धोनीलाच स्वतःच्या पुढच्या वाटचालीबाबत कळेल. निवृत्तीचा निर्णय हा त्याच्याच हाती आहे. तुम्ही त्याला जाणता आणि मीही..''
शास्त्री पुढे म्हणाले,''धोनी स्वतःला चांगलं जाणून आहे. कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर करताना आपण 100 सामने खेळावे असा विचारही त्यानं केला नाही. कुठे थांबायला हवं, हे त्याला माहीत आहे. त्यानं अजून सरावाला सुरुवात केली आहे की नाही, याची मला कल्पना नाही. पण, तो आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक नक्की असेल. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करता न आल्यास, तो स्वतः 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल.''
‘चेन्नई’ धोनीला २०२१ मध्येही कायम ठेवेल, पुढील वर्षाच्या लिलावात करणार रिटेन
बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान
Web Title: Team India head coach Ravi Shastri gives major statement on MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.