India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा!

India's fixtures for WTC 2021-23: आयसीसीनं या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक अन् गुणपद्धती बुधवारी जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:41 PM2021-07-14T12:41:11+5:302021-07-14T12:43:53+5:30

whatsapp join usJoin us
Team India's fixtures for ICC World Test Championship 2021-23, will play Australia, New Zealand and Sri Lanka at home | India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा!

India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship ) पहिल्या पर्वात टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. केन विलियम्समच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ८ विकेट्स राखून विजय मिळवताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. आता आयसीसीनं या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक अन् गुणपद्धती बुधवारी जाहीर केली. ( ICC revealed new points system &  fixtures for World Test Championship 2021-23). त्यामुळे या स्पर्धेची चुरस अधिक रंजक झाली आहे. भारतीय संघाला WTC Final मधील झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. जेव्हा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 

WTC Points System : आयसीसीची मोठी घोषणा, टीम इंडियाला पुन्हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठणे होणार अधिक आव्हानात्मक!

कोणाच्या वाट्याला किती सामने? 
या कालावधीत इंग्लंड सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारत ( 19), ऑस्ट्रेलिया ( 18) आणि दक्षिण आफ्रिका ( 15) यांना सर्वाधिक कसोटी सामने खेळता येणार आहेत. WTCच्या पहिल्या पर्वातील विजेत्या न्यूझीलंडच्या वाट्याला 13 कसोटी सामने आहेत. त्याच्यासोबत वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या वाट्याला 13 सामने आहेत. पाकिस्तान 14 सामने खेळणार आहेत, तर बांगलादेश 12 सामने खेळतील.  

'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा झंझावात, MS Dhoni नेही जोडले होते हात; माहित्येय का हा किस्सा?

कशी असेल नवीन Points System 
प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्यामुळे गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक सामन्याला समान गुण दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक कसोटी विजयाला १२ गुण दिले जाणार आहेत, सामना बरोबरीत सुटल्यास ६-६, तर अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण दिले जाणार आहेत. या गुणांसोबतच टक्केवारीही ठरली आहे. १२ गुणांला १०० टक्के, ६ गुणांना ५० टक्के आणि ४ गुणांना ३३.३३ टक्के दिले जाणार आहेत. दोन सामन्यांची मालिका २४, तिन सामन्यांची मालिका ३६, चार सामन्याची मालिका ४८ आणि पाच सामन्यांची मालिका ६० गुणांची असणार आहे.

भारतीय संघाचे वेळापत्रक
भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे, तर इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहेत. ( India will play Australia, New Zealand and Sri Lanka at home and England, Bangladesh and South Africa at away in ICC World Test Championship 2021-23)

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

  • ४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज
  • १२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स
  • २५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले
  • २ ते ६ सप्टेंबर - ओव्हल
  • १० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड


त्यानंतर न्यूझीलंडचा संघ नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येईल, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा होईल. पण, उर्वरित मालिकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

भारतीय संघाचे वेळापत्रक ( Schedule for Indian team in WTC 2021-23)
वि. इंग्लंड ( ५ कसोटी, इंग्लंड)
वि. न्यूझीलंड ( २ कसोटी, भारत) 
वि. ऑस्ट्रेलिया ( ४ कसोटी, भारत)
वि. दक्षिण आफ्रिका ( ३ कसोटी, द. आफ्रिका)
वि. श्रीलंका ( ३ कसोटी, भारत)
वि. बांगलादेश ( २ कसोटी, बांगलादेश)  

Web Title: Team India's fixtures for ICC World Test Championship 2021-23, will play Australia, New Zealand and Sri Lanka at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.