T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला

पाकिस्तान संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि हिच गोष्ट त्यांना अधिक घातक बनवतेय, असेही गौतम गंभीर म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 11:19 AM2021-09-11T11:19:58+5:302021-09-11T11:20:24+5:30

whatsapp join usJoin us
‘They’re dangerous; have nothing to lose’ – Gautam Gambhir advices teams to beware of Pakistan in T20 World Cup 2021 | T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला

T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं आगामी ट्वेटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाला कमी लेखण्याची चूक करू नका, असा सल्ला अन्य संघांना दिला आहे. संयुक्त अरब अमिराती येथे १८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावाधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानचा संघ धोकादायक आहे आणि ट्वेंटी-२० सारख्या क्रिकेटच्या छोट्या प्रकारात त्यांचा अंदाज बांधणे अवघड आहे. त्यांच्याविरुद्ध केलेली एक चूक सुधारण्याची तुम्हाला संधीही मिळणार नाही, असेही गंभीर म्हणाला. 

 पाचव्या कसोटीच्या आदल्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंची भ्रमंती, स्टोअरमध्ये शॉपिंग अन् फोटोशूट?

तो म्हणाला,''हा खूप धोकादायक संघ आहे. त्यांचा अंदाज बांधणे नेहमीच अवघड जाते आणि त्यामुळेच तो पाकिस्तान क्रिकेट संघ आहे. ते कोणालाही पराभूत करू शकतील आणि कोणाकडूनही हरूही शकतील. ते असेच क्रिकेट खेळत आले आहेत. हे वर्षांनुवर्षाचं आहे आणि त्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत.'' Star Sports च्या India’s T20 World Cup विशेष कार्यक्रमात तो बोलत होता. 

पाकिस्तान संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि हिच गोष्ट त्यांना अधिक घातक बनवतेय, असेही गंभीर म्हणाला. ''पाकिस्तान संघाला हलक्यात घेऊ नका. त्यांच्याकडे बाबर आझम आणि शहिन शाह आफ्रिदी हे चांगले खेळाडू आहे. आफ्रिदी १४०च्या वेगानं स्वींग करणारा चेंडू टाकतो आणि तो डावखुरा गोलंदाज आहे. त्याच्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे हॅरीस रौफ हा घातकी गोलंदाज आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये तुम्हाला पुनरागमनाची संधी मिळत नाही. त्यांच्याकडे गमावण्यासाखे काहीच नाही,''असेही गंभीर म्हणाला.  

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियावर दडपण असेल, ही शक्यता गंभीरनं फेटाळून लावली. तो म्हणाला,''पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड अव्वल आहे आणि ते म्हणतात की भारतावर दडपण असेल. हे सर्व मीडियानं तयार केलेलं दडपण आहे. टीम इंडिया ही पाकिस्तानपेक्षा कैक पटीनं चांगला संघ आहे.'' 
 

Web Title: ‘They’re dangerous; have nothing to lose’ – Gautam Gambhir advices teams to beware of Pakistan in T20 World Cup 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.