आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्याची घोषणा केली अन् त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. आयपीएलचे गव्हर्निंग काऊन्सिलचे चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे जाहीर केले. पण, ही सर्व घोषणा करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) अजून अमिराती क्रिकेट मंडळाला ( इसीबी) याबाबत काहीच कळवलं नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
इरफान पठाननं करून दिली युवराज सिंगला त्याच्या निवृत्तीची आठवण; ट्विटरवर जुगलबंदी
यूएईमध्ये आयपीएल 2020 आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत पटेल यांनी दिली. पुढील आठवड्यात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल आणि त्यामध्ये स्पर्धेच्या तारखा आणि संचालनाची प्रक्रिया निश्चित केली जाईल, अशी माहिती पटेल यांनी दिली. भारत सरकारनं परवानगी दिल्यानंतर आयपीएल 2020चं वेळापत्रक तयार करण्यात येईल, असं पटेल यांनी पुढे सांगितलं. यंदाची आयपीएल ही भारताबाहेर होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता पुढील आठवडयात वेळापत्रकही जाहीर केले जाईल, असे पटेल यांनी सांगितले.
इसीबीनं बुधवारी सांगितलं की,''आयपीएलच्या आयोजनाची अधिकृत माहिती अजूनही बीसीसीआयकडून आम्हाला मिळालेली नाही. ती मिळेल याची आम्ही वाट पाहत आहोत. शिवाय त्यांना अजूनही भारत सरकारकडून परवानगी मिळालेली नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग
IPL 2020चे स्थळ ठरले अन् आता तारीख, वेळही निश्चित झाली?; जाणून घ्या सर्व माहिती!
जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन
ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप!
IPL 2020 पूर्वी टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार? BCCIवर वाढता दबाव
विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!
सावत्र भावानं 27 हजारांसाठी 13 वर्षांच्या बहिणीला विकलं, पण पुढे जे घडलं ते 'भन्नाट' होतं!
कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग
कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक
Web Title: UAE Cricket Board awaits final confirmation from BCCI to host IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.