इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) मुहूर्त अखेर ठरला. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यासाठी सर्व तयारी सुरू केली आहे. कोरोना व्हायरसमुळे 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्याचे जाहीर केले अन् आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. पण, आयपीएल यूएईत होणार असल्यानं चारवेळचा विजेता मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.
Video : प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं; दिव्यांग मुलीची जिद्द पाहून कराल कडक सॅल्यूट!
यापूर्वी 2014मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा यूएईत पार पडला होता. 2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण आयपीएल भारताबाहेर होण्याची ही पहिली वेळ आहे. 2014मध्ये झालेल्या आयपीएलचे एकूण 20 सामने यूएईत झाले होते. त्यापैकी 7 सामने अबु धाबी, 6 सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आणि 7 सामने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाले होते.
दुबई स्टेडियमवर 109 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, तर शाहजाहवर 263 आणि अबु धाबीत 103 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएलच्या 20 सामन्यांपैकी 11 सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकली आहेत. 8 सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकली आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला. पण, मुंबई इंडियन्सची चिंता वाढवणारी आकडेवारी अशी की, त्यांना येथे एकही सामना जिंकता आलेला नाही.
मुंबई इंडियन्सना यूएईत झालेल्या पाचही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. किंग्स इलेव्हन पंजाबनं सर्वच्या सर्व पाचही सामने जिंकले आहेत.
- किंग्स इलेव्हन पंजाब - 5 सामने , 5 विजय
- चेन्नई सुपर किंग्स - 5 सामने, 4 विजय, 1 पराभव
- राजस्थान रॉयल्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभव
- कोलकाता नाईट रायडर्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभव
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
- सनरायझर्स हैदराबाद - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
- दिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
- मुंबई इंडियन्स - 5 सामने, 5 पराभव
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 रद्द करणं बीसीसीआयला परवडलं नसतं, जाणून घ्या का ?
'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!
IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना
Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!
Web Title: UAE is not favourite destination for Mumbai Indian's See this stats
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.