श्रीलंकन क्रिकेटला ढवळून टाकणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या अनेक क्रिकेटपटूंनी बंडाचे निशाण फडकवले आहेत आणि आता ते देश सोडण्याच्या विचारात आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे आणि ते अमेरिकेकडून खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रीय संघात योग्य संधी मिळत नसल्यामुळे व पगार कपातीमुळे ते अमेरिकेत खेळण्याच्या विचारात आहे. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज उपुल थरंगा (Upul Tharanga) आणि दुशमंत चामेरा (Dushmant Chameera) यांच्यासह किमान १५ खेळाडूंची नावे या आहेत.
श्रीलंकेतील ‘ द मॉर्निंग ’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या देशात योग्य संधी मिळन नसल्यानं आणि आर्थिकदृष्ट्या चांगली साथ मिळाल्यामुळे हे खेळाडू निराश झाले आहेत. मागील महिन्यात अष्टपैलू शेहान जयसूर्यानं अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आता अन्य खेळाडूही हाच पर्याय निवडण्याच्या विचारात आहेत. वृत्तानुसार श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगा, वेगवान गोलंदाज दुशमंत चमीरा, अमिला अपोंसो, मलिंदा पुष्पकुमार, दिलशान मुनवीरा, लाहिरू मधुशंका, मनोज सरतचंद्र आणि निशान पेरीस या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंनी अमेरिकेला जाण्याचे ठरवले आहे. हे खेळाडून मार्च महिन्यापर्यंत आपल्या देशातील क्रिकेट सोडून अमेरिकेत जातील. IPL Auction 2021 : आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!
काही खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, " क्रिकेट मंडळाने नुकताच पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या करारामध्ये (द्वितीय दर्जाचे खेळाडू) वाढ न करण्याचा निर्णय घेतला. म्हणून अनेक खेळाडू निघून जाण्याचा विचार करीत आहेत." उपुल थरंगानं १८ आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. त्यानं २३५ वन डे व ३१ कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. RCBच्या ताफ्यात मोहम्मद अझरुद्दीन, सचिन अन् विराट; पाहा काय आहे नक्की भानगड!
Web Title: Upul Tharanga among 15 sri lanka cricketers planning to leave country to play for USA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.