मुंबई : प्रेमाला कसलंच बंधन नसतं. धर्म, जात-पात, पैसा या साऱ्या गोष्टी प्रेमापुढे कधीकधी थिट्या वाटतात. प्रेमामधली ताकद या सर्व गोष्टी दूर करते आणि एक सुंदर आयुष्याला सुरुवात होते. अशीच काहीशी गोष्ट भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि बॉलीवूडमधील सागरिका घाटगे यांच्या लग्नाची...
झहीर खान मुस्लीम, तर सागरिका मराठी त्यामुळे या दोघांचे लग्न होईल की नाही, यावर बरीच चर्चा रंगत होती. पण या दोघांचे प्रेम एवढं घट्ट होतं की, त्यांनी हार मानली नाही. शांतपणे त्यांनी आपल्या कुटुंबियांना समजावलं आणि हे लग्न करण्यासाठी त्यांनी घरच्यांची परवानगी मिळवली. यावेळी फक्त एक गोष्ट या दोघांचे लग्न जमण्यासाठी कारणीभूत ठरली.
क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या झहीरची लव्ह लाईफ एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी आहे. झहीरवर अनेक मुलींचे क्रश होते, पण या गोलंदाजाचं हृदय बॉलिवूडमधील एका नायिकेनं पळवलं होतं. पण, झहीरनं त्याच्या प्रेमाची कधीच सार्वजनिक चर्चा केली नाही.
झहीर आणि सागरिकाने ज्यावेळी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ही गोष्ट झहीरच्या घरात सांगितली. त्यावेळी सागरिकाचा चक दे इंडिया हा चित्रपट आला होता. त्यामुळे झहीरच्या घरच्यांनी हा सिनेमा आम्हाला पहिल्यांदा पाहायचा आहे आणि त्यानंतरच आम्ही तुमच्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेऊ, असे घरातल्यांनी सांगितले. झहीरने लगेचच चक दे इंडिया या चित्रपटाची सीडी आणून दिली आणि हा चित्रपट सगळ्यांना दाखवला. हा चित्रपट पाहिल्यानंतरच माझ्या घरातल्यांनी सागरिका आणि झहीरच्या लग्नाला परवानगी दिली.
दुसरीकडे सागरिकाच्या घरीही काही गोष्टींची चर्चा झाली. सागरिकाचे कुटुंब राजघराण्याशी संबंधित आहे. इंदुरच्या राज घराण्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्याचबरोबर तिच्या घरच्यांना क्रिकेटमध्येही रस होता. त्यांना झहीर खान काय करतो, हे सांगायची गरज भासली नाही. पण सागरिकाच्या घरच्यांना झहीर आवडला, कारण तो चांगलं मराठी बोलू शकत होता. त्यामुळे सागरिकाच्या घरच्यांनीही या लग्नाला परवानगी दिली होती.
सागरिका एका शाही कुटुंबीतील मुलगी आहे. तिचे वडील विजय घाडगे हिंदी सिनेमातील प्रसिद्ध चेहरा आहेत. त्याचसोबत सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणा दरम्यान अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 2013 मध्ये आलेल्या रश या 'इमरान हाश्मी'सोबत दिसली होती. 'चक दे इंडिया' सिनेमातून सागरिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. पंजाबी सिनेमा दिलदरिया तिचा खूप हीट ठरला होता.
सागरिका आणि झहिरची ओळख एका कॉमन फ्रेंडनच्या माध्यमातून झाली होती. सागरिका आणि झहीर लग्न करणार असल्याच्या बातम्या २०१६ पासूनच मीडियात येत होत्या. अखेरीस त्यांनी २४ एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला.
आजही सागरिका चक्क दे गर्ल म्हणूनच ओळखली जाते. सागरिकाने प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. लग्नानंतर सागरिकाने सिनेमांपासून दूर गेली. अभिनेत्री शिवाय सागरिका नॅशनल हॉकी प्लेअर आहे. याच कारणामुळे सागरिका 'चक दे इंडिया'त दिसली होती.
Web Title: ValentinesDay2020: Zaheer Khan and Sagarika Ghatge get married and 'this' one thing help them
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.