भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

सचिन तेंडुलकर आणि स्टीव वॉ यांनी नुकताच त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 10:25 AM2020-06-13T10:25:30+5:302020-06-13T10:32:24+5:30

whatsapp join usJoin us
Vasant Raiji, India’s oldest first-class cricketer, dies at 100 | भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतातील सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.  मुंबईच्या राहत्या घरी त्यांनी झोपेतच असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 1940मध्ये 9 प्रथम श्रेणी सामन्यांत 277धावा केल्या आणि 68 ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती.  भारतीय संघानं बॉम्बे जिमखान्यावर जेव्हा पहिला कसोटी सामना खेळला, तेव्हा रायजी 13 वर्षांचे होते. भारतीय क्रिकेटच्या प्रवासाचे ते साक्षीदारही होते.

1939मध्ये त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नागपूर येथे सेंट्रेल प्रोव्हिन्सेस संघाविरुद्धची ती मॅच होती. पण, त्यांना पहिल्या डावात शून्यावर, तर दुसऱ्या डावात एकच धावा करून माघारी परतावे लागले. त्यानंतर त्यांनी क्रिकेटचा गांभीर्यानं विचार केला. त्यांनी मुंबई ( तेव्हाची बॉम्बे) आणि बदोडा संघाचेही प्रतिनिधित्व केले. लाला अमरनाथ, विजय मर्चंट, सी के नायडू आणि विजय हजारे यांच्यासारख्या दिग्गजांसोबत त्यांनी ड्रेसिंग रुमही शेअर केले होते.  सचिन तेंडुलकर आणि स्टीव वॉ यांनी नुकताच त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला होता.

दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथे ते राहायचे. त्यांनी क्रिकेट सोडून सीए बनण्याचा निर्णय घेतला, परंतु क्रिकेटवरील त्यांचे प्रेम कायम होते. त्यांनी विक्टर ट्रम्पर, सी के नायडू, एलपी जय यांच्यावर पुस्तकं लिहिली. जॉली क्रिकेट क्लबचे ते फाऊंडींग मेंबर होते. ''पहाटे 2.20 वाजता त्यांनी वाळकेश्वर येथील घरी अखेरचा श्वास घेतला,''अशी माहिती त्यांचा जावई सुदर्शन नानावटी यांनी दिली.
 

Web Title: Vasant Raiji, India’s oldest first-class cricketer, dies at 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.