भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. मात्र, निवड समितीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 आणि वन डे अशा दोन्ही संघांत धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विंडीजविरुद्ध धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ शकतो, अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल, याची पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे. क्रिकेटमधून विश्रांती घेतलेला धोनी सध्या युवकांना सुखी संसाराचे धडे शिकवत आहे. लग्न होण्यापूर्वी प्रत्येक पुरुष हा सिंह असतो, पण त्यानंतर त्याचं काय होतं, हे सर्वच जाणतात, असे सांगत धोनीनं पती वर्गाला एक सल्ला दिला आहे.
नुकताच एका कार्यक्रमात धोनीनं बहुमुल्य सल्ला दिला. चेन्नईत झालेल्या या कार्यक्रमात त्याच्या या सल्ल्यानं तमाम पती वर्गात आनंदाचे वातावरण नक्की पसरले असेल. तो म्हणाला,''मी आदर्श पतींपेक्षा चांगला आहे, कारण माझ्या पत्नीला मी तिला जे हवं ते करण्याची मुभा देतो. पती तेव्हाच आनंदी राहू शकतो, जेव्हा त्याची पत्नी आनंदी राहील. त्यामुळेच मी जेव्हा कोणत्याही गोष्टीसाठी पत्नीला होकार देतो, तेव्हा ती आनंदी होते. त्यामुळे मीही आनंदीच राहतो. लग्न होण्यापूर्वी सर्व पुरुष सिंहासारखे असतात.''
पाहा व्हिडीओ...
महेंद्रसिंग धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार, पण टीम इंडियाकडून नाही खेळणार?
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. या कालावधीत त्याला वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नाही. त्यात विंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. विंडीज मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या तीनही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसेल. इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामापूर्वी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. बांगलादेश येथे होणाऱ्या आशियाई एकादश आणि जागतिक संघ यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि यात धोनी आशियाई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. 18 आणि 21 मार्च या तारखेला हे सामने होणार आहेत.
Web Title: Video : MS Dhoni says “Men are like lions till they get married”; calls himself the ideal husband
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.