Video : शोएब अख्तरचा प्रताप; नेटिझन्सकडून होतोय जोरदार ट्रोल

शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 03:09 PM2020-04-11T15:09:03+5:302020-04-11T15:09:36+5:30

whatsapp join usJoin us
Video: Shoaib Akhtar ride bicycle on Islamabad during lockdown; trolls by netizens svg | Video : शोएब अख्तरचा प्रताप; नेटिझन्सकडून होतोय जोरदार ट्रोल

Video : शोएब अख्तरचा प्रताप; नेटिझन्सकडून होतोय जोरदार ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरची सध्या जोरदार चर्चा आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्याचा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता. या मालिकेतून उभा राहणारा निधी कोरोना व्हायरसच्या मदतनिधीत वाटला जाईल असेही त्याचे म्हणणे होते. त्याच्या या प्रस्तावावर जोरदार टीका झाली. भारताचे वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनीही अख्तरला खडेबोल सुनावले. त्यानंतर अख्तरनं भारताकडे 10 हजार व्हेटिंलेटरची मागणी केली, त्यावरही जोरदार टीका झाली. पण, आता अख्तरनं नवा प्रताप केला आहे आणि नेटिझन्सने त्याला फैलावर घेतले.

शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर त्याच्यावर नेटिझन्स तुटून पडले. या व्हिडीओत अख्तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रस्त्यावंर सायकर चावलताना दिसत आहे. मास्क न घातला तो सायकल चालवत होता आणि इस्लामाबादचे कौतुक करत होता. नेटिझन्सनं त्याला लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे ट्रोल केले.  


पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानला 10000 व्हेंटिलेटर द्या अशी विनंती अख्तरनं केली असून पाकिस्तान हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, असेही तो म्हणाला. इंडियन एक्स्प्रेसनं या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अख्तर म्हणाला,''भारतानं आम्हाला 10 हजार व्हेंटिलेटरची मदत केल्यास, आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पण, मी आता क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव ठेवत आहे. पण, अंतिम निर्णय सरकरानं घ्यावा.'' 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल अन् भारतीय मुलीची Untold Love Story; अशी पडली ऑसी खेळाडूची विकेट!

मोठी बातमी : भारताच्या क्रिकेटपटूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!

Corona Virusनं भारताच्या अम्पायरला झाडावर चढवले; नेमके काय घडले?

देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच

Corona Virus : विराट कोहलीपाठोपाठ RCBचा मदतीचा हात; सैन्य, आरोग्य सेवकांसाठी मोठा निर्णय

Web Title: Video: Shoaib Akhtar ride bicycle on Islamabad during lockdown; trolls by netizens svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.