इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना तिथे पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम करत आहे. पाकिस्तान संघानं नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका जिंकून इतिहास रचला. आता पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे तेथेही पहिल्या ट्वेंटी-२०त त्यांनी विजय मिळवला. आज पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे आणि त्यात पदार्पणवीर अर्षद इक्बाल ( Arshad Iqbal) याच्या बाऊन्सरवर झिम्बाब्वेचा फलंदाज तिनाशे कामुन्हुकाम्वे याच्या हॅल्मेटचे दोन तुकडे झाले.
अर्षद इक्बालनं पहिल्याच सामन्यात ४ षटकांत १६ धावांत १ विकेट घेतली. त्यानं सहा प्रथम श्रेणी सामन्यांत २०, ७ लिस्ट ए क्रिकेटमध्ये ११ व २३ ट्वेंटी-२०त २९ विकेट्स घेतल्या आहेत. झिम्बाब्वेनं २० षटकांत ९ बाद ११८ धावा केल्या आहेत. तिनाशेनं सर्वाधिक ३४ धावा चोपल्या. दानिष आझीज व मोहम्मद हस्नैन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video
पाहा व्हिडीओ...
Web Title: Video : Tinashe Kamunhukamwe had his helmet in two pieces after a nasty bouncer from Arshad Iqbal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.