महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या अनेक अविस्मरणीय खेळी आजही क्रिकेट चाहत्यांनी डोळ्यात साठवून ठेवल्या आहेत. आपल्या शैलीदार फटकेबाजीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करणाऱ्या मास्टर ब्लास्टरसाठी आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. वन डे क्रिकेटमध्ये 49 अर्धशतकं झळकावणाऱ्या तेंडुलकरनं आजच्या दिवशी वादळी शतकी खेळी केली होती. त्याच्या आयुष्यातील हे शतक आजही 'Desert Storm' म्हणून ओळखले जाते.
22 वर्षांपूर्वी 1998मध्ये आजच्याच दिवसी तेंडुलकरनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली होती. 24 वर्षीय तेंडुलकरनं तेव्हा 143 धावा कुटल्या होत्या, परंतु भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. शेन वॉर्न, डॅमिएल फ्लेमिंग आमि मिचेल कॅस्प्रोव्हीच या गोलंदाजांची धुलाई करताना तेंडुलकरनं 131 चेंडूंत 143 धावा केल्या. तेंडुलकरच्या या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
शारजात खेळवण्यात आलेला हा सामना वादळामुळे 25 मिनिटे थांबला होता. भारताला 50 षटकांत 285 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु वादळामुळे भारतासोर 46 षटकांत 276 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड अशा तीन देशांमध्ये ही मालिका खेळवण्यात आली होती आणि भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी 46 षटकांत 237 धावा करणे गरजेचे होते.
तेंडुलकरच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 5 बाद 250 धावा केल्या. 26 धावांनी ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला, परंतु तेंडुलकरची खेळी सुवर्ण अक्षरानं लिहिली गेली. अंतिम सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. त्यातही तेंडुलकरनं 134 धावा चोपल्या.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...
संघात निवड झाली नाही, म्हणून रात्रभर रडला होता Virat Kohli!
गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार
गोल्फपटू अर्जुन भाटीनं ठेवला आदर्श; ट्रॉफीनंतर आता 'खास' वस्तू विकून उभारला निधी
Web Title: Video : When Sachin Tendulkar's 143 Against Australia Caused 'Desert Storm' in Sharjah svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.