साऊदम्पटन : भारत धाव सरासरी उत्कृष्ट करण्याच्या निर्धाराने विश्वचषकात शनिवारी पराभवांमुळे खचलेल्या अफगाणिस्तावर मोठा विजय नोंदवण्यासाठी खेळणार आहे. जेतेपदाचा दावेदार असलेल्या भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकतर्फी होण्याची शक्यता असून भारतीय फलंदाज नवे विक्रम नोंदवू शकतात. मोठ्या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग देखील सोपा होईल.