कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलिसांनाही मदत केली आहे. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला होता. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत 3 कोटींची आहे. आता विराट आणि अनुष्का यांनी कोरोना विरुद्ध लढणाऱ्या मुंबई पोलीसांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या उद्देशानं मदत केली आहे.
Corona Virus : Shah Rukh Khanचा संघ करतोय परदेशात गरजूंना मदत
Well Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत
याआधी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं 52 लाखांची मदत केली. यापैकी 31 लाख हे पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर 21 लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 लाखांची मदत केली.
'Virender Sehwag दुसऱ्या संघाकडून खेळला असता, तर हमखास 10 हजार धावा केल्या असत्या!'
भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनं त्याच्या फंडातून 1 कोटींची मदत दिल्ली सरकारला केली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं 50 लाख रुपयांचे तांदुळ गरजूंना दान केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या संलग्न संघटनांसह मिळून 51 कोटींची मदत केली. मुंबई क्रिकेट असोसिएशननं राज्य सरकारला 50 लाखांची मदत केली. शिवाय बीसीसीआयच्या फंडातही 50 लाख दिले.
Sania Mirza चं शोएब मलिकसह 'या' चार कर्णधारांशी Cricket Connection!
रोहितनं पंतप्रधान सहाय्यता निधीत 45 लाखांची मदत केली. शिवाय त्यानं महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले. याशिवाय Zomato Feeding India आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या WelfareOfStrayDogs. संस्थेला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. रोहितनं एकूण 80 लाखांची मदत केली. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनीही 59 लाखांची मदत केली. त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत 35 लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 24 लाख दिले.
मुंबईचो पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी विराट-अनुष्कानं मदत केल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विट केलं की,''कोरोना विरुद्ध लढणाऱ्या मुंबई पोलीसांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये निधी स्वरुपात दिले आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!
अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी Virat Kohli होता ब्राझीलियन मॉडलचा प्रेमात!
कोरोना व्हायरसचा फटका; क्रिकेटपटूवर तंबूतच राहण्याची वेळ
Shocking : ...म्हणून पंजाब पोलिसानं झाडली गोळी, 24 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू
Mohammed Shamiच्या पत्नीनं ट्रोलर्सना सुनावलं; तीन व्हिडीओ शेअर करत घेतला समाचार
Web Title: Virat Kohli and Anushka Sharma donate Rs 5 lakh each for welfare of Mumbai Police personnel svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.