विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेतून रिकॉर्डतोड निधी गोळा केला आहे. विराट व अनुष्का यांनी Ketto सोबत आठवडाभरापूर्वी एक मोहीम सुरू केली आणि सुरुवातीला त्यांनी ७ कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. हा जमा होणारा निधी भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करण्यात येणार आहे. भारताचा कर्णधार व बॉलिवूड अभिनेत्री यांनी केवळ मोहिमेसाठी दान करण्याचं आवाहन केलं नाही, तर त्यांनी स्वतः २ कोटी दान केले. काल MPL Sports Foundationनं ५ कोटींची मदत जाहीर केल्यानंतर ७ कोटींचं लक्ष्य पार झाले आणि विराटनं पुन्हा ११ कोटींचं लक्ष्य समोर ठेवले आणि आज तेही पार केले. विराट व अनुष्कानं या मोहिमेतून ११ कोटी ३९ लाख ११, ८२० जमा केले आहेत. ( Virat Kohli and Anushka Sharma has raised 11,39,11,820 CR for COVID-19 relief in India.)
विराट कोहली म्हणाला, एकदा नव्हे तर दोनदा आम्ही लक्ष्य पार केले. ही आनंदाची बातमी करताना मन भरून आलंय आणि भावना मांडण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. ज्यांनी ज्यांनी या मोहिमेत हातभार लावला त्या सर्वांचे आभार. आपण सर्व एकत्र येऊन हा लढा जिंकूयात. इरफान-युसूफ पठाण यांना सलाम; कोरोना संकटात ९०,००० कुटुंबीयांचे भरले पोट अन् अजूनही मदतकार्य सुरूच
अनुष्का म्हणाली, आपण सर्वांना दाखवलेल्या एकजुटता पाहून मी थक्क झालीय. आम्ही ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक रक्कम जमा केल्याचं सांगताना अत्यानंद होत आहे आणि याने अनेकांचे जीव वाचवले जाऊ शकतात. सर्वांचे मनापासून आभार.
विराट कोहलीचा आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हेही कोरोना लढ्यासाठी काम करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं तामीळनाडू सरकारला 450 ऑक्सिजन संच दिले, सनरायझर्स हैदराबादनं 30 कोटी, तर राजस्थान रॉयल्सनं 7.5 कोटींची मदत केली. शिवाय पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, शिखर धवन आदी खेळाडूंनीही हातभार लावला आहे. यापूर्वी विराट व अनुष्का यांनी आर्थिक मदत केली होती. पण त्यांनी रक्कम जाहीर केली नव्हती, परंतु सुत्रांच्या माहितीनुसार त्यांनी ३ कोटी दान केल्याचे समजले होते.
Web Title: Virat Kohli and Anushka Sharma has raised 11,39,11,820 CR for COVID-19 relief in India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.