भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) लंडन दौऱ्याची तयारी करत आहे. रविवारी त्यानं इंस्टाग्रामवर प्रश्नोत्तराचा वर्ग भरवला अन् चाहत्यांनी विचारलेल्य प्रश्नांची उत्तरे दिली. या सेशनमध्ये काही चाहत्यांनी विराटला त्याच्या मुलीबद्दल विचारले. वामिका असे नाव ठेवण्यामागचा अर्थही अनेकांनी विचारला. एका चाहत्यानं वामिकाचा फोटो पोस्ट करण्याची विनंती केली, परंतु टीम इंडियाचा कर्णधारानं त्यावर भन्नाट उत्तर दिलं. Unseen Photo : विराट कोहलीचा गुरूग्राम येथील ८० कोटींचा आलिशान बंगला पाहिलात का?
विराटनं वामिकाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला,''देवी दुर्गाचं दुसरं नाव वामिका असं आहे. जोपर्यंत वामिकाला सोशल मीडिया म्हणजे काय हे कळत नाही आणि ती स्वतः त्याचा वापर सुरू करत नाही, तोपर्यंत तिचा फोटो पोस्ट न करण्याचा निर्णय मी आणि अनुष्कानं घेतला आहे.'' जानेवारी २०२१मध्ये विराट-अनुष्काच्या घरी नन्ही परी आली. त्यावेळी विराट व अनुष्कानं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कृपया दखल देऊ नका, असे आवाहन केलं होतं. या दोघांनी एकत्रितरित्या एक पोस्ट लिहिली होती.
आणखी एक प्रश्नात चाहत्यानं विराटला त्याच्या डाएटबद्दल विचारले होते. तो म्हणाला,''खूप शाकाहरी जेवण, काही अंडी, २ कप कॉफी, पालक, डोसा, परंतु हे सर्व नियंत्रणात...''
विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रेकॉर्डतोड निधी
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेतून रिकॉर्डतोड निधी गोळा केला आहे. विराट व अनुष्का यांनी Ketto सोबत एक मोहीम सुरू केली आणि सुरुवातीला त्यांनी ७ कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. हा जमा होणारा निधी भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करण्यात येणार आहे. भारताचा कर्णधार व बॉलिवूड अभिनेत्री यांनी केवळ मोहिमेसाठी दान करण्याचं आवाहन केलं नाही, तर त्यांनी स्वतः २ कोटी दान केले. काल MPL Sports Foundationनं ५ कोटींची मदत जाहीर केल्यानंतर ७ कोटींचं लक्ष्य पार झाले आणि विराटनं पुन्हा ११ कोटींचं लक्ष्य समोर ठेवले आणि आज तेही पार केले. विराट व अनुष्कानं या मोहिमेतून ११ कोटी ३९ लाख ११, ८२० जमा केले आहेत.
Web Title: Virat Kohli Instantly Turns Down Fans' Request to Share Daughter Vamika's Picture; Check Reply
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.