भारत-इंग्लंड ( India vs England 4th Test) चौथ्या कसोटीत रिषभ पंतची ( Rishabh Pant) फटकेबाजी पाहून आनंदात असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी शुक्रवारी सायंकाळी वीरेंद्र सेहवागच्या ( Virender Sehwag) चौकार-षटकारांची मेजवानी घेऊन आली. Road Safety World Series रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सलामीच्या सामन्यात वीरूनं ३५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीनं नाबाद ८० धावा कुटल्या. सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) नॉन स्ट्राईकर एंडला उभा राहून वीरूच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीचा आस्वाद लुटत होता. इंडिया लिजंड ( India Legends) संघानं दणक्यात विजय साजरा केला. युवराज सिंगनंही ( Yuvraj Singh) दोन विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वीरूच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं 10.1 षटकांत बांगलादेश लिजंड ( Bangladesh Legends) संघावर 10 विकेट्स राखून विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद
बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांत 109 धावच करता आल्या. युवराज सिंग ( 2/15), प्रग्यान ओझा ( 2/12) आणि विनय कुमार ( 2/25) यांनी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली. बांगलादेशकडून नझीमुद्दीननं 33 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 49 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात वीरूच्या फटकेबाजीनं बांगलादेशच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. मोहम्मद रफिकच्या पहिल्याच चेंडूवर वीरूनं त्याच्या स्टाईलनं चौकार खेचला. पहिल्याच षटकात वीरूनं 4,4,6,0,4,1 अशा 19 धावा कुटल्या. वीरू एकदा गिअरमध्ये आला म्हणजे त्याला थांबवणं शक्य नाही. आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा
त्यानं 35 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या. सचिन तेंडुलकर 26 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 33 धावांवर नाबाद राहिला. वीरूनं सुरुवात चौकारानं केली, तर शेवट षटकारानं केला. त्याच्या 80 धावांमधील 70 धावा या फक्त चौकार-षटकारांनी आल्या. IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार; IPL चेअरमन अन् BCCI सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट अन्...
पाहा वीरूची फटकेबाजी
Web Title: Watch: 1st-ball boundary, upper cut, 50 with six: Virender Sehwag rolls back years in Road Safety World Series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.