Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त आठवडा उरला आहे, पण शनिवारी कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Night Riders) फलंदाज नितीश राणा ( Nitish Rana) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. पण, क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह झाला. आता वानखेडे स्टेडियमवरील ( Wankhede Stadium) ८ मैदान कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या १४व्या पर्वीचे दहा सामने खेळवण्यात येणार आहेत. १० ते २५ एप्रिल या कालावधीत हे सामने होणार आहेत. आता हे नवीन रुग्ण सापडल्यानं BCCIची चिंता वाढली आहे. ( A total of 8 groundsmen of the Wankhede Stadium have tested positive for Covid-19)
वानखेडे स्टेडियमवरील ८ मैदान कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. मागील आठवड्यात १९ मैदान कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ जणांचा कोरोना रिपोर्ट आधीच पॉझिटिव्ह आला होता आणि १ एप्रिलला अन्य पाच जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. मागच्या वर्षी भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती. या मैदान कर्मचाऱ्यांना अन्य ग्राऊंडस्टाफ सदस्यांपासून वेगळं करून आयसोलेशनमध्ये ठेवले आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.
९ एप्रिलला उद्घाटनाचा सामना
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ९ एप्रिलला उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. १० एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना होईल.
वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने
- १० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
- १२ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स
- १५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स
- १६ एप्रिल - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स
- १८ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स
- १९ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
- २१ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स
- २२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
- २४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
- २५ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
Web Title: A week before start of IPL 2021, 8 groundsmen at Wankhede Stadium test positive for Covid-19
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.