IPL 2021 : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, पण खेळतो सिंगापूरसाठी; RCBचा नवा भीडू टीम डेव्हिडचा जगभरात दबदबा! 

रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू संघानं (Royal Challengers Bangalore) संघानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्यासाठी सिंगापूरच्या टीम डेव्हिडला ( Tim David) आपल्या संघात दाखल करून घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:52 AM2021-08-23T10:52:37+5:302021-08-23T10:53:10+5:30

whatsapp join usJoin us
Who’s Tim David? – Here are  facts about RCB’s new entrant for IPL 2021 second leg | IPL 2021 : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, पण खेळतो सिंगापूरसाठी; RCBचा नवा भीडू टीम डेव्हिडचा जगभरात दबदबा! 

IPL 2021 : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, पण खेळतो सिंगापूरसाठी; RCBचा नवा भीडू टीम डेव्हिडचा जगभरात दबदबा! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसंयुक्त अऱब अमिराती येथे ( UAE) 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघानंही तीन नव्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू संघानं (Royal Challengers Bangalore) संघानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्यासाठी सिंगापूरच्या टीम डेव्हिडला ( Tim David) आपल्या संघात दाखल करून घेतले. डेव्हिड हा मुळचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयसीसीनं १०६ सदस्य देशांना ट्वेंटी-२०तील आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. ६ फुटांच्या डेव्हिडनं १५८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५८ धावा केल्या आहेत. त्यानं एकूण ४९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील सामन्यांचा समावेश आहे. त्यात त्यानं ११७१ धावा केल्या आहेत.  

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह झाले लठ्ठ, Photo Viral

बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या रॉयल लंडन कप स्पर्धेत त्यानं सरे क्लबचे प्रतिनिधित्व करताना लिस्ट ए क्रिकेटमधील दोन शतकं झळकावली.  त्यानं तीन सामन्यांत 140*(70), 52*(38) & 102(73) अशा धावा कुटल्या आहेत. त्याच्या समावेशनं RCBच्या मधळ्या फळीला मजबूती मिळणार आहे.  २५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात पुन्हा राहायला गेले अन् डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.  


आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत टीम डेव्हिड ५५व्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ४५७ इतके आहे. ट्वेंटी-२० क्रमवारीत तो फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत, किरॉन पोलार्ड, शिमरोन हेटमायर, रॉस टेलर, स्टीव्ह स्मिथ यांच्याही पुढे आहे.   


RCBकडून तीन खेळाडूंना करारबद्ध
संयुक्त अऱब अमिराती येथे ( UAE) 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघानंही तीन नव्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा हा दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार नाही. त्याच्या जागी RCBनं श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केले आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर वनिंदू हसरंगानं दमदार कामगिरी केली होती. याचसोबत दुसऱ्या टप्प्यात सायमन कॅटिचनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे माईक हेसन यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. दुष्मंथा चमिरा व टीम डेव्हिड हे केन रिचर्डसन व फिन अॅलन यांना रिप्लेस करणार आहेत.

Web Title: Who’s Tim David? – Here are  facts about RCB’s new entrant for IPL 2021 second leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.