WI vs PAK: पाकिस्तानचे ३ फलंदाज २ धावांवर परतले माघारी, गर्मीमुळे तिघांनी सोडलं मैदान; विंडीजसमोर झाली वाईट अवस्था

West Indies vs Pakistan, 2nd Test : वेस्ट इंडिज-पाकिस्तान यांच्यातला दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:55 AM2021-08-21T09:55:39+5:302021-08-21T09:56:15+5:30

whatsapp join usJoin us
WI vs PAK : Pakistan have lost their top three for just 2 run, Babar Azam and Fawad Alam has saved from disaster on day one | WI vs PAK: पाकिस्तानचे ३ फलंदाज २ धावांवर परतले माघारी, गर्मीमुळे तिघांनी सोडलं मैदान; विंडीजसमोर झाली वाईट अवस्था

WI vs PAK: पाकिस्तानचे ३ फलंदाज २ धावांवर परतले माघारी, गर्मीमुळे तिघांनी सोडलं मैदान; विंडीजसमोर झाली वाईट अवस्था

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

West Indies vs Pakistan, 2nd Test : वेस्ट इंडिज-पाकिस्तान यांच्यातला दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू झाला. पहिल्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या यजमान विंडीजनं दुसऱ्या कसोटीतही धडाक्यात सुरुवात केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्ताननं पहिल्या दिवशी ४ बाद २१२ धावा केल्या, परंतु त्यांना या धावा करण्यासाठी प्रचंड संकटांचा सामना करावा लागला. कर्णधार बाबर आजम व फवाद आलम यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी खेळी केली.

MS Dhoni in IPL 2021 promo : महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट अंदाज, सोशल मीडियावर लावली आग, Video

विंडीजनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. केमार रोच व जयडेन सिल्स यांनी पाकिस्तानचे आघाडीचे तीनही फलंदाज अवघ्या २ धावांत माघारी परतले. अबीद अली ( १), इम्रान बट ( १) व अझर अली ( ०) हे माघारी परतल्यानंतर बाबर व फवाद यांनी चौथ्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी केली. पण, जमैकातील वाढत्या गर्मीमुळे फवादला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी जावं लागलं. फवादनं १४९ चेंडूंत ११ चौकारांसह ७६ धावा केल्या.


केमार रोचनं पाकिस्तानला मोठा धक्का दिला. बाबरला त्यानं बाद केलं. बाबरनं १७४ चेंडूंत १३ चौकारांसह ७६ धावा केल्या. मोहम्मद रिझवान ( २२*) व फहीम अश्रफ ( २३*) यांनी दिवसअखेर पाकिस्तानला आणखी धक्का लागू दिला नाही आणि त्यांनी ४ बाद २१२ धावा केल्या. गर्मीमुळे मैदान सोडणारा फवाद हा एकमेव खेळाडू नाही, तर विंडीजच्या अल्झारी जोसेफ व यष्टिरक्षक जोशुआ डा सिल्वा हेही माघारी परतले. 

Web Title: WI vs PAK : Pakistan have lost their top three for just 2 run, Babar Azam and Fawad Alam has saved from disaster on day one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.