T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार

Team India Women Squad for T20 World Cup 2024 Announced : ३ ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:11 PM2024-09-24T16:11:40+5:302024-09-24T16:11:58+5:30

whatsapp join usJoin us
Women's T20 World Cup 2024 We will try to fulfill our dream by winning it, says Team India captain Harmanpreet Kaur | T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार

T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women's T20 World Cup 2024 : यूएईच्या धरतीवर तीन ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आपल्या पुरुष संघाप्रमाणे आपणही विश्वचषकाची ट्रॉफी जिंकावी यासाठी भारताचा संघ मैदानात असेल. याबाबत कर्णधार हरमनप्रीत कौरने एक सूचक विधान केले असून, विश्वचषकाची प्रतिष्ठित ट्रॉफी उंचावण्यासाठी आम्ही आतुर असल्याते तिने सांगितले. हरमनने सांगितले की, ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकणे हे आमच्या संघाचे स्वप्न आहे. मला वाटते की, एक संघ म्हणून आमच्याकडे ट्रॉफी जिंकण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही आहे. 

भारतीय संघात कशाचीच कमतरता नाही. आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही खेळत असलो तरी तमाम भारतीयांचा आम्हाला पाठिंबा असतो. संघातील प्रत्येक सदस्याचे लक्ष्य विश्वचषकावर नाव कोरण्याचे आहे. ही ट्रॉफी जिंकावी हे आमचे स्वप्न आहे आणि मला वाटते की एक संघ म्हणून आम्ही हे नक्कीच करू. आम्ही २०२० च्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. यूएईमध्ये खेळण्याची आमची ही पहिलीच वेळ असेल पण खेळाडूंमध्ये चांगला उत्साह आहे. मला खात्री आहे की आम्ही दुबई आणि शारजाहमध्ये खेळू तेव्हा मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी जमेल, असेही भारतीय कर्णधार हरमनप्रीतने सांगितले. तिने आयसीसीशी बोलताना आपले मत मांडले. 

BCCI ने जाहीर केलेल्या भारताच्या १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अलीकडेच ICC ने T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले. ही स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. महिला विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसीने ठिकाण बदलले. २० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल.

विश्वचषकासाठी भारताचा संघ - 
हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.

Web Title: Women's T20 World Cup 2024 We will try to fulfill our dream by winning it, says Team India captain Harmanpreet Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.