इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानं टीम इंडियाला आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( World Test Championship ) अंतिम सामन्यात प्रवेश करून दिला. भारतानं चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकून ऐटीत WTCच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. आता १८ ते २२ जूनला लंडनमधील साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या फायनलसाठी टीम इंडियानं आतापासून रणनीती आखली आहे. हा सामना लॉर्ड्सवर होणार होता, परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले. टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?
इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर भारतीय संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वात खेळताना दिसतील. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता, आयपीएलमधून अधिकाधिक सराव करण्याचा त्यांचा मानस असेल. आयपीएलनंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी लंडन येथे दाखल होईल. Cricbuzzनं दिलेल्या वृत्तानुसार कसोटी वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियानं आतापासून रणनीती आखली आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया जम्बो चमू लंडनमध्ये पाठवणार आहे आणि तेथील वातावरणाशी त्वरित जुळवून घेता यावं, याकरिता आंतरसंघ सामनेही खेळवले जाणार आहेत. आशिया चषक स्पर्धेत लोकेश राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व; BCCI टीम B मैदानावर उतरवणार, जाणून घ्या Playing XI
हॅम्पशायर क्रिकेटचे चेअरमन रोड ब्रँस्ग्रोव्ह यांनी सांगितले की,''माझ्या माहितीनुसार सराव सामन्याचे आयोजन केले जाणार नाही. टीम इंडिया जम्बो चमू घेऊन येथे दाखल होईल आणि ते स्वतः सराव सामने खेळतील, अशी माहिती मला मिळत आहे. दोन्ही संघ एकाच हॉटेलमध्ये राहणार आहेत. हॉटेलमधील एकूण 170 रुम्स बुक्स केले गेले आहेत.''
विराट कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग; संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोपसंभाव्य संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, रिषभ पंत, वृद्घीमान सहा, करुण नायर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, टी नटराजन, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, हनुमा विहारी, शुबमन गिल, पृथ्वी शॉ.
Web Title: World Test Championship : Jumbo squad, intra-team matches: Indian team finalising plans for WTC final against New Zealand in England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.