WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीच; पहिल्याच दिवशी नोंदवला भारी विक्रम 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:36 PM2021-06-19T19:36:10+5:302021-06-19T19:41:43+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : Virat Kohli becomes only the second Indian batsman to rack up 6000 Test runs at number 4 | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीच; पहिल्याच दिवशी नोंदवला भारी विक्रम 

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीच; पहिल्याच दिवशी नोंदवला भारी विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पण, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमबॅक करताना पहिल्या सत्रातच दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनी जवळपास 15 षटके खेळून काढली. मात्र, त्यांचा धावांची गत अत्यंत संथ होती. पुजारा 54 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराटनं उप कर्णधार अजिंक्य रहाणेसह भारताचा खेळ पुढे सुरू ठेवला. या कामगिरी दरम्यान विराटनं मोठ्या विक्रमाची नोंद केली. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या नावावार. रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रोहित ( 34) व शुबमन ( 28) यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता.   पूजारानं 35 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पहिली धाव चौकारानं घेतली. ही जोडी तोडण्यास ट्रेंट बोल्टला पाचारण करण्यात आले आणि त्यानं 54 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा करणाऱ्या पुजाराला पायचीत करून माघारी पाठवले. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूंत 25 धावांची भागीदारी केली. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today

काळजाचा ठोका चुकला, किवी गोलंदाजाच्या बाऊन्सरनं चेतेश्वर पुजाराच्या हेल्मेटलचे केले दोन तुकडे...


- विराट कोहलीनंसचिन तेंडुलकरनंतर चौथ्या क्रमांवर 6000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. भारताकडून कसोटीत हा पराक्रम करणारा विराट दुसराच फलंदाज ठरला. ( Most Test runs while batting at No.4). सचिन तेंडुलकरनं 13492 धावा केल्या आहेत. त्यानंतर माहेला जयवर्धने ( 9509), जॅक कॅलिस ( 9033 ), ब्रायन लारा ( 7535), जावेद मियादाँद ( 6925),  रॉस टेलर ( 6912 ), मार्क वॉ ( 6662) व केव्हिन पीटरसन ( 6490) यांचा क्रमांक येतो.  भारताकडून विराट कोहलीनं 6000 धावा करताना गुंडप्पा विश्वनाथ यांचा 5081 धावांचा विक्रम मोडला. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today, IND vs NZ World Test Championship

इंग्लंडमध्ये 600+ धावा करणारा विराट हा पहिलाच आशियाई कर्णधार आहे. विराटनं आतापर्यंत 626* धावा केल्या आहेत. ( Most runs by an Asian captain in England Tests). महेंद्रसिंग धोनी ( 569), मोहम्मद अझरुद्दीन ( 468), अँजेलो मॅथ्यूज ( 431)  आणि इम्रान खान ( 403) यांचा नंतर नंबर येतो. ( Virat Kohli is the first ever Asian captain to score 600+ Test runs in England.) 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : Virat Kohli becomes only the second Indian batsman to rack up 6000 Test runs at number 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.