ठळक मुद्देभारतानं पहिल्या डावात २१७ धावा केल्या आहेत आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २ बाद १०१ धावा केल्या आहेत. किवी संघ अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. आजच्या पावच्या दिवसाचा खेळही पावसामुळे उशीरानं सुरू होणार आहे. साऊदॅम्प्टन येथील हवामानाचा लहरीपणा लक्षात घेता उर्वरीत दोन दिवसांत १९६ षटकांचा खेळ होणे अशक्य आहे आणि अशात भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. पण, कसोटी इतिहासातील पहिल्या जागतिक अजिंक्यपदाच्या फायनलचा निकाल असा लागणार असल्याने चाहते ICCवर संतापले आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये हा सामना खेळवायलाच नको होता, असा सूर उमटू लागला आहे. त्यात महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आयसीसीला सल्ला दिला आहे. भारत-न्यूझीलंड सामना ड्रॉ झाल्यास विजेता ठवण्याचा मार्ग आयसीसीला त्यांनी सुचवला आहे. ( Former India captain Sunil Gavaskar feels the ICC should find a way to decide a winner in case the rain-hit World Test Championship final between India and New Zealand here ends in a draw. )
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या WTC फायनलचा निकाल लागावा याकरिता आयसीसीनं २३ जून हा राखीव दिवस ठेवला होता, परंतु कसोटीचा पहिलाच दिवस पावसामुळे वाया गेला अन् आता राखीव दिवस राहिलेला नाही. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत राहण्याची शक्यता बळावली आहे. सुनील गावस्कर यांनी फुटबॉल किंवा टेनिस या खेळात निकाल लावण्यासाठी जसा टाय-ब्रेकरचा वापर केला जातो, तसा विचार ICCनं करायला हवा, असा सल्ला दिला. WTC Final 2021, WTC Final 2021
''जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फायनल सामना ड्रॉ राहिल्यास विजेता ठरवण्यासाठी फार्म्युला असायला हवा. आयसीसीच्या क्रिकेट समितीनं याचा विचार करायला हवा आणि निर्णय घ्यायला हवा. सद्यस्थिती पाहता WTC Final चा निकाल हा ड्रॉ लागण्याची चिन्हे आहेत आणि दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद मिळणार आहे. जेतेपदाची विभागणी होण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. दोन दिवसांत तीन डाव होणे अवघड आहे. दोन्ही संघांनी खराब फलंदाजी केली, तरच तीन डाव होऊ शकतात,''असे गावस्कर यांनी सांगितले. Ind vs NZ Test Final, WTC final 2021
आातपर्यंत १४१.१ षटकांचा खेळ झालेला आहे आणि उर्वरित दोन दिवसांत १९६ षटकांचा खेळ व्हायला हवा. गावस्कर यांनी सांगितले की,''फुटबॉलमध्ये पेनाल्टी शूटआऊट असतो किंवा विजेता ठरवण्यासाठी दुसरा पर्याय असतो. टेनिसमध्ये पाच सेट्स आणि टाय ब्रेकर हा पर्याय असतो.'' IND vs NZ World Test Championship
Web Title: WTC final 2021 : Sunil Gavaskar’s advice to ICC, ‘conduct a tie-breaker like in football’ if rain-hit WTC ends in draw
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.