Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

Former Pacer Zaheer Khan, Wife Offer Prayers at Jharkhand Temple झारखंड येथील रजरप्पामध्ये असलेल्या माता छिन्नमस्तिके मंदिरात जाऊन पूजा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:38 PM2021-03-10T12:38:45+5:302021-03-10T12:58:48+5:30

whatsapp join usJoin us
Zaheer khan and his wife sagarika arrive at chinnamastike temple in rajarappa | Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खान ( Zaheer Khan) आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे ( Sagarika Ghadge) यांनी मंगळवारी झारखंड येथील रजरप्पामध्ये असलेल्या माता छिन्नमस्तिके मंदिरात जाऊन पूजा केली. या दोघांनी तेथे जाऊन देवीचा आशीर्वाद घेतला. या दोघांचा मंदिरातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  लोकेश राहुलला नेमकं खेळवायचं कुठे?; Playing XI निवडताना विराट कोहलीची डोकेदुखी वाढली

झहीर खान -सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?
झहीर खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी त्याची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने एक खूप छान फोटो शेअर केला होता. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सागरिका प्रेग्नेंट आणि लवकरच हे कपल आई-वडील होणार आहेत. जहीर खान आणि सागरिका 2017मध्ये लग्नबंधनात अडकले. रिपोर्टनुसार सागरिका आणि जहीरच्या काही मित्र-मैत्रिणींनी या बातमीला कन्फर्म केले आहे लवकरच दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. अद्याप सागरिका-झहीरने या वृत्ताला दुजोर दिला नाही.  T Natarajan दुखापतग्रस्त; वरुण चक्रवर्थी, टेवाटिया फिटनेस टेस्टमध्ये नापास, टीम इंडिया मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला बोलवणार!

सागरिका एका शाही कुटुंबीतील मुलगी
तिचे वडील विजयेंद्र घाडगे हिंदी सिनेमातील प्रसिद्ध चेहरा आहेत. त्याचसोबत सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणा दरम्यान अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 2013 मध्ये आलेल्या रश या 'इमरान हाश्मी'सोबत दिसली होती. 'चक दे इंडिया' सिनेमातून सागरिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. पंजाबी सिनेमा दिलदरिया तिचा खूप हीट ठरला होता. Monty Panesar : 'ये तो बिल्कुल नही बदला यार'; सचिन अन् युवराजची विकेट घेतल्यानंतर चर्चेत आला माँटी पानेसर

Web Title: Zaheer khan and his wife sagarika arrive at chinnamastike temple in rajarappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.