Shocking : १५०* धावा करून संघाला संकटातून बाहेर काढलं अन् ड्रेसिंग रुममध्ये जाताच केली निवृत्ती जाहीर!

Mahmudullah retire from Test cricket तिसऱ्या दिवशी संघाचा डाव संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतताच महमुदुल्लाहनं सहकाऱ्यांना त्याचा निर्णय कळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 12:17 PM2021-07-10T12:17:35+5:302021-07-10T12:17:51+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs BAN :  Mahmudullah makes shock decision to retire from Test cricket | Shocking : १५०* धावा करून संघाला संकटातून बाहेर काढलं अन् ड्रेसिंग रुममध्ये जाताच केली निवृत्ती जाहीर!

Shocking : १५०* धावा करून संघाला संकटातून बाहेर काढलं अन् ड्रेसिंग रुममध्ये जाताच केली निवृत्ती जाहीर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात ८ बाद २७० धावांवर असलेल्या बांगलादेश संघाला ४६८ धावांपर्यंत मजल मारून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महमुदुल्लानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ( Mahmudullah has announced to his Bangladesh team-mates that he has retired from Test cricket.) तिसऱ्या दिवशी संघाचा डाव संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतताच महमुदुल्लाहनं सहकाऱ्यांना त्याचा निर्णय कळवला. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं पोस्ट केलेल्या व्हिडीओत किंवा सोशल मीडियावर महमुदुल्लाहनं याबाबत कोणतीच घोषणा अद्याप केलेली नाही. ESPN Cricinfoनं ही बातमी दिली आहे.

WI vs AUS : ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज १९ धावांत माघारी; वेस्ट इंडिजने मारली बाजी, १० वर्षांत आंद्रे रसेलचे पहिले अर्धशतक!

महमुदुल्लाह आणि तस्कीन महमद यांनी नवव्या विकेटसाठी १९१ धावांची विक्रमी भागीदारी केली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रेसिडेंट नझमुल हसन यांनी महमुदुल्लाहनं सामना सुरू असताना जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे खेळावर परिणाम होऊ शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. महमुदुल्लाह त्याचा ५०वा कसोटी सामना खेळत आहे आणि त्यानं या सामन्यात पाचवे कसोटी शतक पूर्ण केलं. त्यानं २७८ चेंडूंत १७ चौकार व १ षटकारासह नाबाद १५० धावा केल्या. बांगलादेशनं पहिल्या डावात ४६८ धावा केल्या. तस्कीन अहमदनं ७५ धावा केल्या.

 

मैत्री असावी तर अशी!; IPL 2022मध्ये जर महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर मी पण खेळणार नाही; सुरेश रैना

ढाका प्रीमिअर ट्वेंटी-२० लीगमध्ये तमीम इक्बाल व मुश्फीकर रहीम यांना दुखापत झाली अन् अखेरच्या क्षणाला महमुदुल्लाहची कसोटी संघात निवड करण्यात आली. १८ महिन्यानंतर तो कसोटी संघात परतला. त्यानं मागच्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. हसन यांनी सांगितले की, त्याचा हा निर्णय अनपेक्षित, अस्वीकार्य आणि भावनेच्या भरात घेतलेला आहे. अधिकृतपणे त्यानं आम्हाला कळवलेलं नाही. मला काही खेळाडूंनी फोनकरून हे सांगितले.


महमुदुल्लाह २००९ ते २०१७ या कालावधीत बांगलादेशच्या सर्व फॉरमॅटमधील संघाचा सदस्य होता, परंतु मागील चार वर्षांत त्याला दोन वेळा कसोटी संघातून वगळण्यात आले. २०१९-२०२० मध्ये अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर त्याला वगळले गेले. त्यानं १९७ वन डे व ८९ ट्वेंटी-२० सामन्यांत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. 

Web Title: ZIM vs BAN :  Mahmudullah makes shock decision to retire from Test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.