ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी

ZIM vs IND 1st T20I Live Match Updates In Marathi : झिम्बाब्वेने भारताचा पराभव करून विजयी सलामी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 07:50 PM2024-07-06T19:50:07+5:302024-07-06T20:00:37+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs IND 1st T20I Live Match Updates In Marathi Zimbabwe defeated Team India led by Shubman Gill | ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी

ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ZIM vs IND 1st T20I Live | हरारे : पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिलाच सामना अटीतटीचा झाला. भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. झिम्बाब्वेच्या नवख्या संघाने कडवी झुंज देताना भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेने दिलेल्या ११६ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अपयश आले. पदार्पणाचा सामना खेळत असलेला अभिषेक शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. मग ऋतुराज गायकवाडच्या रूपात भारताला दुसरा झटका बसला. टीम इंडियाकडून शुबमन गिल वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही, गिलने २९ चेंडूत सर्वाधिक ३१ धावा केल्या. अखेर भारत १९.५ षटकांत अवघ्या १०२ धावांत सर्वबाद झाला अन् १३ धावांनी सामना गमावला.

यजमान संघाच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचा कोणताच शिलेदार टिकला नाही. भारताकडून अभिषेक शर्मा (०), शुबमन गिल (३१), ऋतुराज गायकवाड (७), रियान पराग (२), रिंकू सिंग (०), ध्रुव जुरेल (६), आवेश खान (१६), मुकेश कुमार (०) आणि वॉशिंग्टन सुंदर (२७) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर तेंदई चतारा (२), ब्रायन बेनेट, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे आणि ब्लेसिंग मुजारबानी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

तत्पुर्वी, भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुकेश कुमारने डावाच्या दुसऱ्याच षटकात झिम्बाब्वेला मोठा झटका देत बळी घेतला. त्यानंतर बिश्नोईने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याचे काम केले. त्याला वॉशिंग्टन सुंदरने चांगली साथ दिली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ बळी घेतले, त्याने त्याच्या ४ षटकांत अवघ्या १३ धावा देत ही किमया साधली. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर (२), मुकेश कुमार (१) आणि आवेश खानला (१) बळी घेण्यात यश आले. झिम्बाब्वेकडून वेस्ली मधेवेरे (२१), सिकंदर रझा (१७), ब्रायन बेनेट (२२), डायन मायर्स (२३) आणि क्लाइव्ह मंडेने नाबाद (२९) धावा केल्या. अखेर यजमान संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद केवळ ११५ धावा करू शकला. भारताला विजयी सलामी देण्यासाठी झिम्बाब्वेने ११६ धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला घाम फुटला. 

दरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला शनिवारपासून सुरुवात झाली. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यातून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी भारतीय संघात पदार्पण केले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची युवा ब्रिगेड मैदानात आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा (पदार्पण), ऋतुराज गायकवाड, रियान पराग (पदार्पण), रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (पदार्पण), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद. 

झिम्बाब्वेचा संघ - 
सिकंदर रझा (कर्णधार), तदीवानाशे मारूमानी, इनोसेंट कॅया, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जॉनथन कँपबेल, क्लाइव्ह मंडे, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चतारा.

Web Title: ZIM vs IND 1st T20I Live Match Updates In Marathi Zimbabwe defeated Team India led by Shubman Gill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.