विमानतळावर पकडले १ कोटी ३० लाखांचे सोने, दोघांना अटक
By मनोज गडनीस | Published: December 20, 2023 05:51 PM2023-12-20T17:51:27+5:302023-12-20T17:51:56+5:30
मोहम्मद फैजल (२४) आणि स्टीफन किशोर (२६) अशी या दोन आरोपींची नावे असून हे दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत.
मुंबई - मुंबई विमानतळावरून तामिळनाडू येथे जाणाऱ्या दोन प्रवाशांना सोने तस्करी केल्या प्रकरणी सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडे एकूण २४०० ग्रॅम सोने सापडले असून या सोन्याची किंमत १ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे.
मोहम्मद फैजल (२४) आणि स्टीफन किशोर (२६) अशी या दोन आरोपींची नावे असून हे दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. मुंबईतून तामिळनाडू येथे जाणाऱ्या विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती.
अधिकाऱ्यांनी त्या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांवर देखरेख सुरू केली होती. त्यावेळी दोन्ही तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या सामानामध्ये हे सोने लपविले असल्याचे आढळून आले.