फूटपाथवर सामान विकणाऱ्या महिलेला १ कोटीची लॉटरी; रक्कम मिळण्याआधीच मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:15 PM2024-06-17T13:15:30+5:302024-06-17T13:17:03+5:30

वारंवार नशीब आजमावणाऱ्या वृद्ध महिलेची फसवणूक, नशीबानं साथ दिली पण विक्रेत्यानं विश्वासघात केला. 

1 crore lottery to a woman in Kerala, a case has been registered for cheating by the seller | फूटपाथवर सामान विकणाऱ्या महिलेला १ कोटीची लॉटरी; रक्कम मिळण्याआधीच मोठा ट्विस्ट

फूटपाथवर सामान विकणाऱ्या महिलेला १ कोटीची लॉटरी; रक्कम मिळण्याआधीच मोठा ट्विस्ट

नवी दिल्ली - फूटपाथवर लहान मुलांचं सामान विकणाऱ्या ७२ वर्षीय सुकुमारी अम्माला नेहमी स्वत:चं हक्काचं घर असावं असं स्वप्न होतं. मात्र कमाई इतकी जास्त नव्हती ज्यानं हे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळेच सुकुमारी अम्मा लॉटरी खरेदी करून नेहमी नशीब आजमावत होती. १५ मे २०२४ ला सुकुमारी अम्माचं नशीब उजळलं. तिनं एक दिवसापूर्वी लॉटरीचं तिकिट खरेदी केलं होतं. त्यावर १ कोटी बक्षीस लागलं. मात्र ही रक्कम सुकुमारी अम्माला मिळण्याअगोदरच तिची फसवणूक झाली. 

सुकुमारी अम्मानं १४ मे रोजी विक्रेत्याकडून एका सीरिजची १२ तिकिटे खरेदी केली होती. त्या तिकिटासाठी महिलेनं १२०० रुपये दिले होते. विक्रेत्याला जेव्हा कळालं सुकुमारी अम्माला १ कोटीची लॉटरी लागली आहे तेव्हा त्याच्या मनात लालसा आली. त्याने सुकुमारी अम्माला तुमच्या सर्व तिकिटांवर १००-१०० रुपये बक्षीस लागल्याचं सांगितलं. त्यामुळे सुकुमारी अम्माच्या पदरी पुन्हा निराशा पडली.मात्र लॉटरी विक्रेता त्याच्या घरी आनंदात पोहचला आणि घरच्यांना त्याला १ कोटीची लॉटरी लागल्याचं सांगितले.

विक्रेत्याच्या घराशेजारी आणखी एक लॉटरी विक्रेता राहायचा. त्याला ठाऊक होते की, ज्या तिकीटावर १ कोटीची लॉटरी लागली ती सुकुमारी अम्मानं खरेदी केली होती. त्याने सुकुमारी अम्माला हा प्रकार सांगितला. त्यानंतर महिलेनं पोलीस ठाणे गाठत त्या विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत लॉटरी विक्रेत्याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली. मात्र विक्रेत्याने लॉटरीच्या तिकिटामागे त्याचे नाव लिहून बँकेत जमा केलं होतं. 

दरम्यान, सुकुमारी अम्माच्या तक्रारीवरून विक्रेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र कोर्टात साम्यंजस्याने लॉटरी विक्रेत्याविरोधातला खटला मागे घेण्यास सुकुमारी अम्मा तयार झाली. त्यानंतर विक्रेत्याने तिला जिंकलेली लॉटरी तिकिट परत केली, त्यानंतर ही तिकिट पुन्हा सुकुमारी अम्मानं बँकेत जमा केली. जिंकलेल्या रक्कमेवरील टॅक्स कापल्यानंतर सुकुमारी अम्माच्या हाती ६३ लाख रुपये आले आणि अशाप्रकारे फूटपाथवर सामान विक्री करणारी ७२ वर्षीय अम्मा लखपती झाली. 

Web Title: 1 crore lottery to a woman in Kerala, a case has been registered for cheating by the seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.