सायबर पोलिसांच्या १९३० हेल्पलाईनमुळे अवघ्या २४ तासांत वाचले एक कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 09:00 AM2024-04-27T09:00:45+5:302024-04-27T09:01:54+5:30
बोरिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार यांची कुरिअर स्कॅमप्रकरणी फसवणूक झाली. त्यांनी हेल्पलाइनवर तक्रार दिली
मुंबई : सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनमुळे गेल्या २४ तासांत शेअर ट्रेडिंग गुंतवणूक आणि कुरिअर स्कॅममध्ये फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी एक कोटी वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.
कांदिवली व वांद्रे मुंबई येथे राहणारे तक्रारदार यांची शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळण्याचे आमिष दाखवून त्यांना १ कोटी ८० लाख व २ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक झाली. तसेच बोरिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार यांची कुरिअर स्कॅमप्रकरणी फसवणूक झाली. त्यांनी हेल्पलाइनवर तक्रार दिली. त्यानुसार, पथकाने तत्काळ संबंधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलिस उपनिरीक्षक बावस्कर यांच्या पथकाने कारवाई केली.