सेवा विकास बॅँकेची १० कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:26 AM2019-02-08T01:26:03+5:302019-02-08T01:26:20+5:30

  व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता आहे, असे भासवून वादातील मिळकत बँकेकडे तारण ठेवली. बॅँकेकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले.

10 crore fraud of service development bank | सेवा विकास बॅँकेची १० कोटींची फसवणूक

सेवा विकास बॅँकेची १० कोटींची फसवणूक

googlenewsNext

पिंपरी -  व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता आहे, असे भासवून वादातील मिळकत बँकेकडे तारण ठेवली. बॅँकेकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले. ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता दुसऱ्याच कारणासाठी उपयोगात आणली. बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक अधिकाºयांनी आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सेवाराम तनवानी यांनी फसवणूकप्रकरणी आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सागर सूर्यवंशी, तसेच शीतल तेजवानी-सूर्यवंशी (रा. कोरेगाव पार्क) अशी आरोपींची नावे आहेत. सागर आणि शीतल हे दोघे मे. रेणुका लॉन्सचे भागीदार होते. त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या दोघांनी सेवा विकास बॅँकेकडून कर्ज घेतले. वाकड येथील सर्व्हे क्रमांक १५३/१ ए मधील ३० आर मिळकत निर्विवाद आहे, असे भासवून बँकेकडे गहाण ठेवली. या मिळकतीचे कागदपत्र सादर करून कर्ज रक्कम घेतली. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम प्रत्यक्षात व्यवसायासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. बँकेची फसवणूक केली.

Web Title: 10 crore fraud of service development bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.