श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त

By निखिल म्हात्रे | Published: August 27, 2023 10:53 PM2023-08-27T22:53:15+5:302023-08-27T22:53:45+5:30

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती.

10 kg packets of narcotics seized at Srivardhan beach | श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त

googlenewsNext

अलिबाग - श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १०किलो ५५८ ग्रॅम वजनाची अंमली पदार्थाची पाकिटे मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी अंमली पदार्थाची पाकिटे मिळून आली होती. त्यानंतर रायगड पोलिस सतर्क झाले होते.

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. तसेच या शोध मोहिमेबाबत सर्व सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मच्छीमार सोसायट्या आणि सागरी सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले होते. रविवारी शोध मोहीम सुरू असताना संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन बीच येथे अफघान प्रोडक्ट नाव असलेली नऊ अंमली पदार्थांची पाकिटे सापडली. यासर्व पाकिटांचे वजन १०किलो ५५८ ग्रॅम आहे. या सर्व घटनेचा तालुका दंडाधिकारी यांचे समक्ष पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(व), २० (5) (२) (ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारची आणखी पाकिटे मिळण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात माहिती यावी. नागरिकांना अंमली पदार्थाची पाकिटे मिळाल्यास स्वतःच्या फायद्याकरिता लपवून ठेवल्यास त्यांचेवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात येईल.
- सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड.

Web Title: 10 kg packets of narcotics seized at Srivardhan beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.