भयंकर! जन्मदात्याने केला 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; मुलीचा मृत्यू झाल्याचं कसं ओळखू?, गुगलवर केलं सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 11:25 AM2020-10-09T11:25:37+5:302020-10-09T11:25:46+5:30

10 Month Old Girl Rape : एका पित्याने आपल्या 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलगी कोणतीच हालचाल करत नसल्याचं पाहून या आरोपीने गुगलवर मुलीचा मृत्यू झाला आहे की ती जिवंत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्चही केलं.

10 month girl dies after raped by her father who googled how do i know if baby is dead | भयंकर! जन्मदात्याने केला 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; मुलीचा मृत्यू झाल्याचं कसं ओळखू?, गुगलवर केलं सर्च

भयंकर! जन्मदात्याने केला 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; मुलीचा मृत्यू झाल्याचं कसं ओळखू?, गुगलवर केलं सर्च

Next

वॉशिंग्टन - जगभरात बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहे. अशातच अमेरिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर मुलगी जिवंत आहे की तिचा मृत्यू झाला आहे हे कसं चेक करू? असं गुगलवर सर्च केलं आहे. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 

एका पित्याने आपल्या 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलगी कोणतीच हालचाल करत नसल्याचं पाहून या आरोपीने गुगलवर मुलीचा मृत्यू झाला आहे की ती जिवंत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्चही केलं. तसेच या धक्कादायक घटनेनंतर दोन तासांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अंतर्गत गंभीर जखमा झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

जन्मदात्याने केला 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय स्टीवन ऑस्टिन या व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आपल्या 10 महिन्यांच्या मुलीवर ऑस्टिनने बलात्कार केला. ऑस्टिन एक फुटबॉल प्रशिक्षक आहे. ऑस्टिनविरोधात लैंगिक अत्याचार, मुलीवर बलात्कार करणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोंटगोमरी काऊंटी जिल्हा न्यायालयातील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्टिनने पोलिसांना फोन करुन आपल्या मुलीचा श्वास बंद पडला आहे अशी माहिती दिली. 

ब्राऊजर सर्च हिस्ट्रीमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस 

ऑस्टिन मुलीला रुग्णालयात घेऊन गेला मात्र डॉक्टरांना तिचा जीव वाचवता आला नाही. रुग्णालयाने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्टिनच्या ब्राऊजर सर्च हिस्ट्रीमुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ऑस्टिनने पोलिसांना फोन करण्याच्या एक तास आधी गुगलवर मुलगी जिवंत आहे की तिचा मृत्यू झाला हे कसं कळेल असं सर्च केलं होतं. तसेच त्याने आपल्या मित्रांकडेही मेसेजच्या माध्यमातून यासंदर्भात मदत मागितली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: 10 month girl dies after raped by her father who googled how do i know if baby is dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.