१० महिन्यांच्या मुलीचा कारमधून पडून मृत्यू; आई, मुलगी पडल्या की ढकलले? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 08:54 AM2022-12-11T08:54:22+5:302022-12-11T08:55:10+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली.

10-month-old girl dies after falling from car; Mother, daughter fell or pushed? | १० महिन्यांच्या मुलीचा कारमधून पडून मृत्यू; आई, मुलगी पडल्या की ढकलले? 

१० महिन्यांच्या मुलीचा कारमधून पडून मृत्यू; आई, मुलगी पडल्या की ढकलले? 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कारमधून घरी जात असताना आई व चिमुकली पडल्याने आई गंभीर जखमी झाली तर १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मात्र या दोघी पडल्या की त्यांना ढकलले हे अद्याप स्पष्ट झाले नसून मांडवी पोलीस तपास करत आहे.

वाडा येथे राहणाऱ्या सोनाक्षी वाकडे (२०) या १० महिन्यांच्या लावण्या या चिमुकलीसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरमार्गे कारने शनिवारी सकाळी जात होते. विरार फाटा येथील नोव्हेल्टी हॉटेलसमोर दोघीही कारमधून पडल्या. त्याचवेळी पाठीमागून जाणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाने त्यांना पाहिले व दोघींनाही नालासोपारा येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत.

आई गंभीर जखमी
नेमके त्या  दोघी पडल्या, की त्यांना ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या आईवर उपचार सुरू आहेत. महिला जबाब बदलत असल्याने नेमकी घटना काय घडली ते स्पष्ट होत नाही आहे. याबाबत तपास करत आहे. 
- प्रफुल वाघ, पोलिस निरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे

Web Title: 10-month-old girl dies after falling from car; Mother, daughter fell or pushed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.