तब्बल 12 तलवारी आणि मोठ्या शस्त्र साठ्यासह 10 जण पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 05:27 PM2023-02-24T17:27:23+5:302023-02-24T17:29:02+5:30

crime news : ही धारदार शस्त्रे राजस्थानमधून महाराष्ट्रात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

10 persons arrest in dhule, as many as 12 swords and large cache of weapons | तब्बल 12 तलवारी आणि मोठ्या शस्त्र साठ्यासह 10 जण पोलिसांच्या जाळ्यात

तब्बल 12 तलवारी आणि मोठ्या शस्त्र साठ्यासह 10 जण पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

धुळे : इंदूर येथून विविध हत्यारे घेऊन धुळ्याकडे जात असलेल्या एका टोळीला शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्ट जवळ मोठ्या शस्त्र साठ्यासह ताब्यात घेतले आहे. ही धारदार शस्त्रे राजस्थानमधून महाराष्ट्रात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड या सीमा तपासणी नाका येथून पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा गाडीमधून होणारी धारदार शस्त्रांची वाहतूक रोखली असून या कारवाईत पोलिसांनी तब्बल 12 तलवारीसह, दोन गुप्ती, एक चोपर, एक बटनाचा चाकू, दोन फायटर इतका मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळून आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गाडीसह सुमारे 6 लाख 29 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शिरपूर तालुका पोलिसांना केलेल्या या कारवाईत पोलिसांनी सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण, विठ्ठल सोनवणे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिरपूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना आणि त्यांच्या पथकाला दिले आहे.      

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक वातावरण चांगलेच ढवळले असून गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने सोनगीर जवळ तब्बल 90 तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई जप्त केलेल्या तलवारी नेमक्या कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणल्या जात होत्या, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अवघ्या वर्षभराच्या आतच तलवारी जप्त करण्याची ही तिसरी घटना असून यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: 10 persons arrest in dhule, as many as 12 swords and large cache of weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.