जामिनासाठी महिलेकडून 10 हजारांची PSI, कॉन्स्टेबलने घेतली लाच अन् अडकले एसीबीच्या सापळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:11 PM2021-11-24T22:11:12+5:302021-11-24T22:11:42+5:30

ACB Trap : उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे ( ५७ रा.खांडे मळा,सिडको) व पोलीस शिपाई दीपक बाळकृष्ण वाणी (३२ रा.उत्तमनगर,सिडको) अशी लाचखोर फौजदारासह पोलीस शिपायाचे नाव आहे.

10 thousand PSI from woman for bail,psi and constable took bribe and caught in ACB trap | जामिनासाठी महिलेकडून 10 हजारांची PSI, कॉन्स्टेबलने घेतली लाच अन् अडकले एसीबीच्या सापळ्यात

जामिनासाठी महिलेकडून 10 हजारांची PSI, कॉन्स्टेबलने घेतली लाच अन् अडकले एसीबीच्या सापळ्यात

Next

नाशिक : पोलीस ठाणे स्तरावर जामिन प्रक्रिया पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दहा हजाराची लाच स्विकारणाऱ्या अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासहरासह एका पोलीस शिपायाला 'एसीबी'च्या पथकाने रंगेहाथ पोलीस ठाण्याच्या आवारातच सापळा रचून ताब्यात घेतले आहेत.

उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे ( ५७ रा.खांडे मळा,सिडको) व पोलीस शिपाई दीपक बाळकृष्ण वाणी (३२ रा.उत्तमनगर,सिडको) अशी लाचखोर फौजदारासह पोलीस शिपायाचे नाव आहे. डीजीपीनगर भागात राहणाºया याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महिलेवर अंबड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुह्यात अटक टाळण्यासाठी महिलेने न्यायालयात धाव घेतल्याने तिला कोर्टाने अंतरिम जामिन मंजूर केला आहे. पोलीस स्टेशन स्तरावर जामिन प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी महिलेने संशयीतांची भेट घेतली असता त्यांनी १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती दहा हजार रूपये देण्याचे ठरले होते. याबाबत महिलेने एसीबीशी संपर्क साधला असता ही कारवाई करण्यात आली. संशयीतांपैकी पोलीस शिपाई असलेल्या वाणी याने पंचासमोर दहा हजाराची लाच स्विकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले. दोघांनाही एसीबी पथकाने ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.

Web Title: 10 thousand PSI from woman for bail,psi and constable took bribe and caught in ACB trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.