बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 04:48 PM2020-07-15T16:48:18+5:302020-07-15T16:57:42+5:30
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक छोटा मुलगा त्या कोऑपरेटीव्ह बँकेमध्ये सकाळी 11 च्या सुमारास आला होता. त्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये हळूच प्रवेश केला. त्या कॅशिअरसमोर ग्राहकही उभे होते.
इंदौर : मध्य प्रदेशच्या निमूच जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. एका 10 वर्षांच्या मुलाने बँक कर्मचारी, ग्राहकांच्या डोळ्यात धूळ फेकत केवळ 30 सेकंदांत तिजोरीतून 10 लाख रुपये उडविले आहेत. या चोरीमुळे बँक प्रशासनासह पोलिसांचेही डोळे विस्फारले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक छोटा मुलगा त्या कोऑपरेटीव्ह बँकेमध्ये सकाळी 11 च्या सुमारास आला होता. त्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये हळूच प्रवेश केला. त्या कॅशिअरसमोर ग्राहकही उभे होते. मात्र, यांच्यापैकी कोणालाही कळू न देता या मुलाने अवघ्या 30 सेकंदांत 10 लाख रुपये चोरले.
विशेष म्हणजे त्याने या तिजोरीतील नोटांची बंडले बॅगेत टाकली. ही चोरी त्याने अवघ्या 30 सेकंदांत केली. मात्र, तो बाहेर पडू लागताच अलार्म वाजू लागला आणि सुरक्षा रक्षक त्याच्या दिशेने धावला. त्याला पाहून हा मुलगाही पळू लागला. पोलिसांनी सीसीव्ही फुटेजमध्ये पाहिले तेव्हा त्याच्या आधी एक 20 वर्षांचा तरुण बँकेत आला होता. त्याने जवळपास 30 मिनिटे रेकी केली. त्याने या मुलाला या तिजोरीबाबत सांगितले आणि या मुलाने त्याच्या सांगण्यावरून चोरीचा प्रयत्न केला.
कॅशिअर त्याच्या जागेवरून उठल्याचे पाहताच या तरुणाने त्या मुलाला आत जाण्याचा इशारा केला. त्या मुलाने आतमध्ये जात तिजोरीचा आड केलेला दरवाज उघडला आणि लगेचच 500 रुपयांची बंडले घेऊन पळ काढला. हा अल्पवयीन मुलगा उंचीने छोटा असल्याने कॅशिअरच्या काऊंटरसमोर उभ्या असलेल्या ग्राहकांना दिसू शकला नाही, असे निमुचचे पोलिस अधिक्षक मनोज राय यांनी सांगितले. फॉरेन्सिक एक्सपर्टही याचा तपास करत आहेत.
बँकेबाहेरील सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसत आहे की, तो तरुण आणि मुलगा दोन दिशांना पळाले आहेत. या प्रकरणी आम्ही काही संशयितांना ताब्यात घेतले असून रस्त्यावरील स्टॉलधारकांनाही चौकशीसाठी घेतले आहेत. तसेच सुरक्षा रक्षकाचीही चौकशी सुरु आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा
...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल
सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर
फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर
एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले
बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली
'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार