माझ्या खिशात १००० रुपये, त्यातून अंत्यसंस्कार करा; बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 11:59 AM2023-08-13T11:59:07+5:302023-08-13T11:59:20+5:30

सुधीरच्या सुसाईड नोटमध्ये पेपर मिल डीजीएम अजय दुरटकर आणि कंत्राटदार संजय दानव यांनी छळल्याचा आरोप केला आहे.

1000 rupees in my pocket, cremate it; Suicide due to unemployment in chandrapur | माझ्या खिशात १००० रुपये, त्यातून अंत्यसंस्कार करा; बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या

माझ्या खिशात १००० रुपये, त्यातून अंत्यसंस्कार करा; बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या

googlenewsNext

चंद्रपूर – बल्लारपूर येथील बिल्ट पेपर मिल कंपनी आणि कंत्राटदारांच्या छळाला कंटाळून एका कंत्राटी कामगाराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुधीर लोखंडे असं या कामगाराचे नाव आहे. गेल्या ९ महिन्यापासून सुधीर लोखंडे यांना काम मिळणे बंद झाले होते. ज्यामुळे सुधीर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या खचला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूरच्या विद्यानगर येथे राहणारा सुधीर पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा. ९ महिन्यापूर्वी त्याला कंपनीने कामावरून कमी केले. त्यामुळे तो त्रस्त होता. सुधीरच्या आईची तब्येत बिघडली होती. अशा परिस्थितीत सुधीर लोखंडे याच्यावर मानसिक आणि आर्थिक दडपण आले होते. याला कंटाळून अखेर सुधीर लोखंडे यांनी मृत्यूला कवटाळलं. सुधीरच्या मागे त्याची आई, पत्नी आणि २ मुले असं कुटुंब आहे.

सुधीरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने सुधीरला फासावर लटकलेला पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सुधीरचा मृतदेह खाली उतरवून तो पोस्टमोर्टमला पाठवला. पोलिसांनी तपास केला असता सुधीरच्या खिशात १ सुसाईड नोट आढळली. त्यात सुधीरने जे काही लिहिलं हे ऐकून कुटुंबाला अश्रू अनावर झाले.

सुधीरच्या सुसाईड नोटमध्ये पेपर मिल डीजीएम अजय दुरटकर आणि कंत्राटदार संजय दानव यांनी छळल्याचा आरोप केला आहे. सुधीरने या दोघांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पेपर मिल अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कलम ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत सुधीरच्या नोटमध्ये म्हटलं होतं की, माझ्या खिशात १ हजार रुपये आहेत, त्यातून अंत्यसंस्कार करा असं वाचून पत्नीने हंबरडा फोडला.

सुधीरचे नातेवाईक जयदास भगत यांनी सांगितले की, सुधीर मागील २५ वर्षापासून बल्लारपूरच्या पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करतोय. ९ महिन्यापूर्वी कंत्राटदाराने सुधीरला कामावरून काढून टाकले. तेव्हापासून तो तणावात आहे. त्याने पेपर मिल अधिकारी आणि कंत्राटदार यांची अनेकदा भेट घेतली परंतु त्याला काम मिळाले नाही. मानसिक छळ आणि आर्थिक दडपणाखाली येऊन त्याने अखेर जीवन संपवले असं भगत यांनी म्हटलं.

 

Web Title: 1000 rupees in my pocket, cremate it; Suicide due to unemployment in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.