पप्पा, लवकर या,..; शेतातून घरी परतताच मुलगी मात्र जिवंतच नव्हती, बाप हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:55 PM2023-03-22T13:55:15+5:302023-03-22T13:55:33+5:30

सातत्याने तिला आईची आठवण येत होती. आईच्या निधनानंतर सारिकाच्या वागण्यात बदल झाला.

10th class girl commits suicide in Pilibhit | पप्पा, लवकर या,..; शेतातून घरी परतताच मुलगी मात्र जिवंतच नव्हती, बाप हादरला

पप्पा, लवकर या,..; शेतातून घरी परतताच मुलगी मात्र जिवंतच नव्हती, बाप हादरला

googlenewsNext

पीलीभीत - शहरातील बिलसंडा परिसरात दहावीत शिकणाऱ्या मुलीचा मंगळवारी खोलीत ओढणीला फास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. वडील शेतावरून घरी पोहचले तेव्हा ही घटना उघडकीस आली. या घटनेनं कुटुंबाला मोठा धक्का बसला असून नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. 

१६ वर्षाच्या सारिकाचं आईवरचं प्रेम तिच्या घरच्यांना कळालेच नाही. सारिका आईला विसरेल असं घरच्यांना वाटत होते परंतु आईच्या मृत्यूने सारिकाला जबर धक्का बसला होता. सातत्याने तिला आईची आठवण येत होती. आईच्या निधनानंतर सारिकाच्या वागण्यात बदल झाला. ती हळूहळू शांत राहू लागली. कुणाशीची बोलत नसायची. सारिकाच्या आईचा २०१५ मध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला. 

आईच्या मृत्यूवेळी सारिका फक्त ९ वर्षांची होती. अचानक आई सोडून गेल्यानं सारिकाच्या आयुष्यावर परिणाम झाला. सारिका स्वभावाने शांत होती. आईच्या मृत्यूनंतर ती समजूतदार झाली होती. या घटनेनंतर सारिका छोटा भाऊ आयुषसह स्वत:ला सांभाळण्यास लागली होती. परंतु एकाएकी सारिकाच्या शांत स्वभावामुळे नातेवाईकांना काही कळाले नाही. ५ दिवसांपासून सारिका आई रोमीचा फोटो सातत्याने पाहत होती. 

कुटुंबाने म्हटलं की, सारिका हातात आईचा फोटो घेऊन तिच्या आठवणीत हरवून जायची. सोमवारी सारिका घरी एकटी असताना तिला स्वत:ला सांभाळता आले नाही. एकटेपणामुळे तिने खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. आईचा विरह सहन न झाल्याने सारिकाने आत्महत्या केली असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. 

पप्पा, लवकर या.... 
मुलगी सारिकाच्या निधनानं वडिलांचे डोळे पाणावले होते. ७ वर्षापूर्वी पत्नी आणि आता एकलुती एक मुलगी सारिकाच्या जाण्याने त्यांना धक्का बसला होता. सारिका खूप समजूतदार होती. आईच्या मृत्यूनंतर तिने घरची जबाबदारी चांगल्यारितीने सांभाळली. सोमवारी रात्री शेतात जाताना तिने पप्पा, लवकर या, आज मसूरची डाळ बनवली आहे असं म्हटलं. पण जेव्हा मी परतलो तेव्हा सारिका हे जग सोडून गेली होती. मृत्यूपूर्वी सारिकाने माझ्यासाठी जेवण तयार करून ठेवले होते असं वडिलांनी म्हटलं. 

Web Title: 10th class girl commits suicide in Pilibhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.