अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:03 IST2021-04-03T14:53:53+5:302021-04-03T15:03:46+5:30
Fake IPS caught in Rajasthan : गुरूवारी रात्री पाली जिल्ह्याच्या नव्या बस स्टॅंडवर पकडला गेलेला आरोपी स्वत:ला सीबीआयचा एसपी सांगत ट्रॅव्हल एजंटवर दबाव टाकत होता.

अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला!
राजस्थानच्या (Rajasthan) पाली जिल्ह्यात एका फेक आयपीएसचा(Fake IPS) भांडाफोड झाला. केवळ १०वी शिकलेला हा तरूण चार वर्षापासून फेक आयपीएस बनून लोकांची फसवणूक (Fraud) करत होता. तेही आयपीएस अधिकाऱ्याचा पोशाख घालून. पोशाखावर आयपीएसचे बॅचेज, अशोक स्तंभ, स्टार लागलेले होते. सोबतच फेक आयडी कार्ड, फेक एअरगन आणि वॉकी-टॉकी. तसेच २०१५ मध्ये कॉन्स्टेबल परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नव्हता. तेव्हापासून तो फेक आयपीएस बनून लोकांची फसवणूक करत आहे.
गुरूवारी रात्री पाली जिल्ह्याच्या नव्या बस स्टॅंडवर पकडला गेलेला आरोपी स्वत:ला सीबीआयचा एसपी सांगत ट्रॅव्हल एजंटवर दबाव टाकत होता. जेणेकरून एसी बसमधून त्याला फ्रीमध्ये मुंबईला जाता यावं. ट्रॅव्हल एजंटच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी फुसारामला अटक केली.
त्याच्या आयडी कार्यवर राजवीर शर्मा ऊर्फ रामप्रसाद शर्मा लिहिलं होतं. आरोपी फुसाराम पाली जिल्ह्यातील सर्वोदय नगरचा राहणारा आहे. जिल्ह्याचे एसपी कालूराम रावत यांनी सांगितले की, नवीन बस स्टॅंड चौकीचे प्रभारी ओमप्रकाश चौधरी आणि त्यांची टीम आरोपीला बघून हैराण झाली होती. कारण तो तंतोतंत आयपीएससारखा दिसत होता.
जेव्हा आरोपी फुसारामला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याने सगळं सत्य सांगितलं. त्यानंतर आरोपीला कोर्टात सादर करण्यात आलं. तेथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. आरोपीची वर्दी, त्यावरील बॅच, अशोक स्तंभ, स्टार, फेक आयडी, फेक एअरगन इतर वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.
असे सांगितले जात आहे की, याच आरोपीने ४ वर्षापूर्वी पालीच्या वीडी नगरमध्ये एका तरूणीला तो आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याला पकडलं होतं. पण त्यावेळी वर्दीत नसल्याने त्याला केवळ इशारा देऊन सोडण्यात आलं होतं.
जेव्हा पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी काढली तर समजले की त्याचा परिवार मुळचा रेण नागौरचा राहणारा आहे. त्याचे वडील होमगार्ड सर्विसमध्ये असल्याने परिवार पालीमध्ये येऊन वसला होता. आरोपी फुसारामच्या कारनाम्यांनी त्याची पत्नीही त्रासली होती. ती त्याला सोडून गेली होती. त्याच्यावर हुंड्यासाठी त्रास देण्याचाही गुन्हा दाखल आहे.