आधी यूट्यूबवर सर्च केली गळफास घेण्याची पद्धत, मग आत्महत्या करून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:18 PM2021-10-11T14:18:25+5:302021-10-11T14:20:20+5:30

पोलिसांनुसार, अथाईपुरा इथे राहणारी १६ वर्षीय अंशुमन सिंह आपल्या आजोबांच्या घरी राहून १०व्या वर्गात शिकत होता.

UP : 10th student searched on youtube method of suicide then swung from noose | आधी यूट्यूबवर सर्च केली गळफास घेण्याची पद्धत, मग आत्महत्या करून संपवलं जीवन

आधी यूट्यूबवर सर्च केली गळफास घेण्याची पद्धत, मग आत्महत्या करून संपवलं जीवन

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात एका १०व्या वर्गात शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलेलं नाही. विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याआधी आपल्या मोबाइलमध्ये यूट्यूबवर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची पद्धत सर्च केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

यूट्यूबवर सर्च केली फाशीची पद्धत

पोलिसांनुसार, अथाईपुरा इथे राहणारी १६ वर्षीय अंशुमन सिंह आपल्या आजोबांच्या घरी राहून १०व्या वर्गात शिकत होता. काल रात्री तो आपल्या घराच्या छतावर फिरण्यासाठी गेला आणि छतावरच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा सकाळी तो रूममध्ये आढळला नाही तेव्हा त्यांना छतावर जाऊन पाहिलं तर तिथे अंशुमन गळफास घेतलेला दिसला.

त्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनुसार, अंशुमन जास्तीत जास्त वेळ आपल्या मोबाइलमधेच व्यस्त राहत होता आणि त्यांची मोबाइल हिस्ट्री चेक केली गेली तर त्याने आत्महत्या करण्याआधी यूट्यूबवर सोप्या पद्धतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याबाबत सर्च केलं होतं. त्याने आत्महत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट नाही. 

ASP ललितपूर गिरिजेश कुमार म्हणाले की, अथाईपुरा गावातील १६ वर्षीय अंशुमन सिंह १०व्या वर्गातील विद्यार्थी होता. तो आजोबांकडे राहून शिक्षण घेत होता. त्याने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पुढील  चौकशी करत आहेत.
 

Web Title: UP : 10th student searched on youtube method of suicide then swung from noose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.